मुंबई:येथे आमदार शिवाजीराव देशमुख ८४ व्या वाढदिवसानिमित्त यांनी केक कापून वाढदिवस कुंटूबासमवेत साजरा केला यावेळी स्नुषा रेणुकादेवी देशमुख, नात साईतेजस्वी देशमुख उपस्थित होत्या. |
शिवाजीराव देशमुखांच्यामुळेच महाराष्ट्रभर कार्यकर्त्यांला सन्मान मिळतो
: माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे
शिराळा,ता.१३वसंतदादांच्या विचाराचा खरा पाईक म्हणून शिवाजीराव देशमुख यांचेक़डे संपुर्ण महाराष्ट्र पाहत आहे.त्यामुळेच महाराष्ट्रभर त्यांच्या कार्यकर्त्याला सन्मान मिळतो हेच कार्यकर्त्यांसाठी मोठा अभिमानाचीबाब आहे,असे प्रतिपादन अखिल भारतीय साखर संघाचे माजी अध्यक्ष, माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी केले.
शिराळा येथे आमदार शिवाजीराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यात बोलत होते. यावेळी सांगली जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष आ.मोहनराव कदम, वसंतदादा साखर कारखाना अध्यक्ष विशाल पाटील, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस सरचिटणीस सत्यजित देशमुख, बाळासाहेब गुरव,शंकरराव चरापले, अशोकराव पाटील प्रमुख उपस्थित होते.
यावेळी आवाडे म्हणाले,आयुष्यभर ते तत्वाशी एकनिष्ठ आहेत. वसंतदादांचे विचार पुढे नेण्याचे काम त्यांनी केले आहे. भाजपच्या अन्यायी कामाने जनता वैतागली असून कॉंग्रेस शिवाय पर्याय नाही हे आज जनतेला कळले आहे.
आमदार मोहनराव कदम म्हणाले, राज्याच्या राजकारणामध्ये एक आदर्श नेता म्हणून देशमुख यांचे नाव घेतले जाते. त्यांनी केलेले काम सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
विशाल पाटील म्हणाले,वसंतदादांच्या बरोबरीने मला देशमुख साहेबांनी प्रेम दिले आहे. सत्यजित देशमुख यांच्या पाठिशी ताकद उभी करण्याची जबाबदारी आमची आहे.
यावेळी फत्तेसिंगराव देशमुख, संपतराव देशमुख, दत्तात्रय पाटील, उदयसिंगराव नाईक, डॉ.पी.डी.पाटील, व्ही.टी.पाटील, जयराज पाटील, संदीप जाधव, प्रताप घाडगे, विश्वास कदम, सभापती मायावती कांबळे, के.डी.पाटील, महादेव कदम, विजयराव नलवडे, आकाराम मस्के, शिवाजी नांगरे, जयसिंगराव शिंदे, मनिषा रोटे, बाजार समिती सभापती सुजित देशमुख, ज्योस्ना पाटील, मारुती जाधव, आर.ए.पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या उपस्थित होते. आभार आनंदराव पाटील यांनी मानले.
मान्यवरांच्या प्रत्यक्ष भेटून व दूरध्वनी शुभेच्छा
महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष खा.अशोकराव चव्हाण,माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक, माजी राज्यपाल डी.वाय.पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार बाळासाहेब थोरात, खा.राजू सातव, आ.सतेज उर्फ बंटी पाटील, माजी आमदार पी.एन.पाटील, माजी मंत्री प्रकाश आवाडे, आ.आनंदराव पाटील, माजी मंत्री प्रतिक पाटील, खा.संजयकाका पाटील,विलासकाका उंडाळकर, आ.बाळासाहेब पाटील, आ.भाई जगताप, माजी मंत्री मधुकर चव्हाण, माजी जि.प.सदस्य अभिजित पाटील,संजय डी.पाटील, डॉ.अतुल भोसले, सांगली जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, माजी आमदार सदाशिवराव पाटील यांच्यासह विविध गावचे सरपंच, सेवासंस्थाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी देशमुख यांना शुभेच्छा दिल्या
0 Comments