BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शिराळा तालुक्यात व्यापा-यांचा कडकडीत बंद



शिराळा तालुक्यात व्यापा-यांचा कडकडीत बंद

  वॉलमार्ट, फ्लिपकार्ट यासारख्या परदेशी व्यापारी संस्थांना मान्यता देऊन केंद्र सरकार देशातील लहान , मोठया दुकानदारांविरुद्ध व्यापारी धोरणे राबवत असल्याच्या निषेधार्थ शिराळा तालुक्यात आज सर्व व्यापारी वर्गाने कडकडीत बंद पाळण्यात आला यावेळी शहरातून मोटारसायकल रॅली काढण्यात आली होती.
    आज शुक्रवार रोजी सर्व व्यापार  बंद ठेवण्यात आला होता.यावेळी तहसीलदार शितलकुमार यादव यांना मागण्या बाबत निवेदन देण्यात आले. या निवेदनात  वॉलमार्ट, फ्लिपकार्ट यासारख्या परदेशी व्यापारी संस्थांना मान्यता देऊन केंद्र सरकार देशातील लहान , मोठया दुकानदारांविरुद्ध व्यापारी धोरणे राबवत असल्याच्या सरकारच्या धोरणामुळे सर्व प्रकारच्या लहान , मोठा व्यापार उद्धवस्त होणार आहे त्यामुळे व्यापाऱ्यांवर उपासमारीची वेळ येणार आहे.त्यामुळे ही मान्यता रद्द करावी अशी मागणी करण्यात आली आहे. तहसीलदार यादव यांनी आपण  मागण्या बाबत शासनास कळवून पाठपुरावा करू असे सांगितले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष अमोल पारेख , उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव ,सशफी मुल्ला, विनोद मुळीक, अविनाश चितुरकर , सुनील कदम, निसार मुल्ला, राजेंद्र कोरे , महेश चरणकर , गणेश आवटे आदी उपस्थित होते.
  आजतालुक्यातील किराणा , भुसार , हार्डवेअर, औषध , वितरक ,कापड , जनरल , हॉटेल आदी सर्व व्यापार बंद ठेऊन बंद ठेऊन कडकडीत बंद पाळण्यात आला.यावेळी शहरातील सोमवार पेठ , मेन रोड, गुरुवार पेठ एस टी बस स्थानक आदी मार्गावरुन मोटारसायकल रॅली काढण्यात आली होती.

Post a Comment

0 Comments