BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६ --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शिराळ्यात स्वाईन फ्लूचे संशयित रुग्ण

शिराळ्यात स्वाईन फ्लूचे संशयित रुग्ण
शिराळा,ता.८: शिराळा येथील स्वाइन फ्लू ची लागण झालेले  दोन संशयित रुग्ण आढळले आहेत त्यांना कराड  येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
आरोग्य विभागाकडून सदर रुग्णाच्या परिसरातील नागरिकांची तपासणी  सुरू करण्यात आली असून शहरातील नागरिकांचे सर्वेक्षण सुरू करण्यात येणार आहे.
   याबाबत आरोग्य विभागाकडून मिळालेली माहिती अशी की,  २० ऑगस्ट रोजी शिराळा येथे भजनी मंडळाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर एक महिलेस ताप आदी आले यानंतर त्यानी खाजगी दवाखान्यात उपचार केले , मात्र तब्बेतीत सुधारणा न झालेने कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले त्यावेळी तपासणी केली असता सदर महिलेस स्वाइन फ्लू झालेचे निष्पन्न झाले .
  सदर महिलेच्या संपर्कात आलेल्या दोन दहा वर्षा खलील मुलांच्यात स्वाइन फ्लू ची लक्षणे आढळून आल्याने दोन्ही मुलांना ही कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्या रक्ताचे नमुने तपासणी साठी पुण्याला पाठवण्यात आले आहेत.
   या महिलेच्या घरा जवळील वीस घरातील १५० नागरिकांची  संपूर्ण सर्वेक्षण चालू करण्यात आले आहे तसेच शहरातील सर्वेक्षण तातडीने सुरू करण्यात येणार असलेचे प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एस. बी.पवार यांनी सांगितले. भजनी मंडळा च्या कार्यक्रमास मोठया प्रमाणात महिला , पुरुष शिराळा शहरातून तसेच विविध ठिकाणाहून आले असलेने हे नागरिक हुडकून त्यांची तपासणी करणे आवश्यक आहे त्यादृष्टीने सर्वेक्षण चालू करण्यात येणार आहे तसेच नागरिकांनीही ताप, सर्दी आदी आल्यास तातडीने ग्रामीण रुग्णालयात उपचार घ्यावेत तसेच सर्वेक्षणा साठी येणाऱ्या अधिकारी व कर्मचारी वर्गास माहिती द्यावी असे अवाहन डॉ विलास रावळ व डॉ. अनिरुद्ध काकडे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments