"उड्डाण "मध्ये सह्याद्री चे उल्लेखनीय यश
RIT (राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक.)साखराळे, इस्लामपूर येथे उड्डाण या राष्ट्रीय क्रीडा महोत्सव आयोजित केलेल्या महोत्सवात बुद्धिबळ चित्रकला, हस्तकला, प्रश्नमंजुषा, वक्तृत्व या स्पर्धेत सह्याद्री पब्लिक स्कूल च्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.ईशा चौधरी हीचा हस्तकला स्पर्धेत प्रथम क्रमांक ,श्रुती पाटीलने प्रश्नमंजुषा स्पर्धेत प्रथम क्रमांक, शिवानी जाधव चित्रकला स्पर्धेत द्वितीय ,गायत्री पार्टे चित्रकला स्पर्धेत तृतीय ओंकार पाटील याने बुद्धिबळ स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवला.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा संस्थेचे चेअरमन सुनिल पाटील,संचालिका श्रीमती सुकेशनी दळवी,संचालिका साधना पार्टे, प्राचार्य गजानन पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मार्गदर्शक शिक्षक संदीप भोसले ,मारुती बोरगे, सौ शुभांगी पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
1 Comments
Congrats winners
ReplyDelete