शिराळा:नूतन सभापती सुजित देशमुख व
उपसभापती नंदा पाटील यांचा सत्कार करताना माजी आमदार मानसिंगराव नाईक,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सत्यजित देशमुख,हणमंतराव पाटील, संपतराव देशमुख
|
शिराळा:नूतन सभापती सुजित देशमुख व
उपसभापती नंदा पाटील यांचा सत्कार करताना निवडणूक निर्णय अधिकारी अमोल डफळे सोबत सचिव के.डी.मगदूम व सर्व संचालक
|
सभापतीपदी सुजित देशमुख तर उपसभापतीपदी नंदा पाटील बिनविरोध
शिराळा,ता.७: कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी कॉंग्रेसच्या सुजित देशमुख तर उपसभापतीपदी राष्ट्रवादीच्या नंदा पाटील यांची बिनविरोध निवड झाली.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहायक निबंधक अमोल डफळे यांनी काम पहिले. सभापती,उपसभापती यांचा सत्कार माजी आमदार मानसिंगराव नाईक, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस सत्यजित देशमुख व निवडणूक निर्णय अधिकारी डफळे यांच्या हस्ते करण्यात आला.
सभापती सुरेश पाटील व उपसभापती सुभाष पाटील यांनी तीन वर्षाचा कार्यकाल संपल्याने राजीनामा दिल्याने हि निवड करण्यात आली.
बाजार समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार मानसिंगराव नाईक व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सत्यजित देशमुख यांची सत्ता आहे. यावेळी एस.जे.साळवी, माजी उपसभापती सुभाष पाटील, संचालक सुरेश पाटील, शंकर कदम, बाबासो पाटील, शामराव कुरणे, विष्णू पाटील, संपत देशमुख,मारुती येळवे, दिलीप कुंभार,दिलीप परदेशी, कविता पाटील,ज्ञानू दिंडे, मंगेश कांबळे,नामदेव बेंद्रे, भास्कर महिंद, सचिव के.डी.मगदूम , जे.बी.पाटील, एच.एम.पाटील, बी.डी.पाटील, डी.के.माळी, आर.के.कांबळे उपस्थित होते.
0 Comments