BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६ --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

महाडीक युवा शक्तीच्या लाखाच्या दहीहंडीवर तासगावच्या "शिवनेरी"चा ताबा



शिराळा:येथे महाडीक युवा शक्तीच्यावतीने आयोजित केलेल्या लाखाच्या दहीहंडीचे मानकरी ठरलेल्या तासगावच्या शिवनेरी गोविंदा पथकास एक लाख तीन हजार तीन रुपयाचा धनादेश देताना कृषी मंत्री सदाभाऊ खोत, खासदार धनंजय महाडीक, डॉ.निलेश राणे,नानासाहेब महाडीक,नगराध्यक्ष निशिकांत पाटील, राहुल महाडीक,सम्राट महाडीक,गौरव नायकवडी,केदार नलवडे
महाडीक युवा शक्तीच्या लाखाच्या दहीहंडीवर तासगावच्या "शिवनेरी"चा ताबा
शिराळा, ता.६: महाडीक युवा शक्तीच्यावतीने आयोजित केलेल्या लाखाच्या दहीहंडीचे मान   तासगावच्या शिवनेरी गोविंदा पथकाने पटकावला.
येथील भुईकोट किल्ला येथे महाडीक युवा शक्तीच्यावतीने १लाख ३ हजार ३ रुपये किंमतीच्या दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते.  या स्पर्धेत अजिंक्यतारा शिरोळ, शिवनेरी तासगाव, शिवगर्जना तासगाव, गोविंदा पथक वाकुर्डे या चार गोविंदा पथकांनी सहभाग घेतला होता. शिवनेरी गोविंदा पथक तासगावने सात थर लावून हंडी फोडण्याचा मान पटकावला.
तरुणाईला आकर्षित करण्यासाठी मानसी नाईक,ऐश्वर्या साळवी,तन्वी कोलते यांच्यासह मुंबईच्या कलाकारांचा नृत्याविष्कार ठेवण्यात आला होता.लगिर झालं जी फेम राहुल्याने हजेरी लावून तरुणाईचा जोश वाढविला.
 कृषी मंत्री सदाभाऊ खोत, खासदार धनंजय महाडीक, डॉ.निलेश राणे,नानासाहेब महाडीक,नगराध्यक्ष निशिकांत पाटील, राहुल महाडीक,सम्राट महाडीक,गौरव नायकवडी यांच्या   हस्ते शिवनेरी गोविंदा पथकास बक्षीस देऊन गौरवण्यात आले.
या कार्यक्रमासाठी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सी.बी.पाटील, जिल्हा परिषद सदस्य जगन्नाथ माळी,  वनश्री महिला आघाडीच्या अध्यक्षा विद्याताई पाटील, नगरसेवक केदार नलवडे, राम जाधव, महादेव कदम, झाकीर दिवाण, बाळू गोसावी, अमित ओसवाल, कपिल ओसवाल अनिल घोडे ,उद्योजक विजय पाटील, शिवाजी पाटील,सतीश महाडीक, बंटी अग्रवाल,  विकास रोकडे, मंदार उबाळे, सचिन दिवटे, अभिषेक हसबनीस, हरून शेख, अमित माने, सुमित पाटील, शुभम देशमुख, बाजीराव नलवडे, भूषण पाटील,संतोष बाचूलकर,प्रतीक हसबनीस उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments