चिखली (ता. शिराळा) येथे महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकास्तरीय मेळाव्यात बोलता चित्राताई वाघ. व्यासपीठावर मानसिंगराव नाईक, सौ. सुनितादेवी नाईक, सौ. छायाताई पाटील, विजयराव नलवडे, सौ. सुनंदा सोनटक्के, रुपाली भोसले आदी.
चिखली (ता. शिराळा) येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकास्तरीय महिला मेळाव्यात बोलत होत्या. माजी आमदार मानसिंगराव नाईक अध्यक्षस्थानी होते.
यावेळी वाघ म्हणाल्या, भाजप राज्यात मरण स्वस्त, जगणं महाग झाले आहे. राम कदमांसारखी प्रवृत्ती जाहिरपणे महिला, मुलींबाबद अपशब्द काढत असताना मुख्यमंत्री त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे धारीष्ट्य दाखवत नाहीत. रोज मुलींवर अत्याचार होत आहेत. महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. पेट्रोल, डिझेल चे दर गगनाला भिडले आहेत. जीएसटी ने छोटे उघोजक, व्यापारी बेहाल झाले आहेत. नोटाबंदी, कर्जमाफी फसवी ठरली आहे. सरकारी यंत्रणेचा वापर इतरांची मुस्कटदाबी करण्यासाठी केला जात आहे. बेटी बचावो म्हणाणारेच बेटी भगाओचा नारा देत आहेत. अशा दुटप्पी भूमिका असणार्या सरकारला पायऊतार करण्यासाठी महिलांनी तयार रहावे.
नाईक म्हणाले, हे सरकार फक्त जाहिरातबाजी करत आहे. यांनी निवडणूकीत दिलेल्या एकाही आश्वासनांची पूर्तता केलेली नाही. एकवी वाढती महागाई, पेट्रोल, डिझेल वाढ, भ्रष्टाचारावर आघाडी सरकारला धारेवर धरणारे भाजपवाले आता काहीच कसे बोलत नाहीत. राज्यातील शेतकरी आत्महत्या का थांबल्या नाहीत. हे सरकार फक्त जाहिरातबाजी करून जनतेची फसवणूक कारत आहे. यांना आता घरी बसविण्याची वेळ आली आहे.
प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक नगराध्यक्षा सुनंदा सोनटक्के यांनी केले. बाजार समितीच्या नुतन उपसभापतीपदी निवड झालेल्या सौ. नंदाताई पाटील यांचा सत्कार सौ. चित्राताई वाघ यांच्या हस्ते झाला. या वेळी सुनितादेवी नाईक, महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष छायाताई पाटील यांचे मनोगत झाले. राष्ट्र्वादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयराव नलवडे, पंचायत समिती सदस्या मनिषा गुरव , वैशाली माने युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राहूल पवार,शुभांगी देसाई, रुपाली भोसले, प्रा. निता जोखे-आडके, डॉ. मिनाक्षी पाटील, स्मिता महिंद, जयश्री पाटील, वैशाली कदम, वंदना यादव, वैशाली घोडे, शिराळ्याच्या नगरसेवक सुजाता इंगवले, प्रतिभा पवार आदी उपस्थित होते.
बेटी बचावो म्हणणाऱ्यांच्याच तोंडी भगाओची भाषा : चित्राताई वाघ
शिराळा,ता.१०: भाजपाच्या राज्यात मरण स्वस्त, जगणं महाग झाले आहे. बेटी बचावो म्हणणारेच बेटी भगावची भाषा करत असल्याचे प्रतिपादन महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ यांनी केले.चिखली (ता. शिराळा) येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकास्तरीय महिला मेळाव्यात बोलत होत्या. माजी आमदार मानसिंगराव नाईक अध्यक्षस्थानी होते.

0 Comments