खेळाकडे करिअर म्हणून पाहा: डॉ. प्रताप पाटील
महिलांनी खेळाकडे करिअर म्हणून पाहीले पाहीजे असे मत वारणा शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. प्रताप पाटील यांनी केले. एेतवडे येथे विद्यार्थ्याच्या गुणगौरव प्रसंगी ते बोलत होते.शांतीनिकेतन सांगली येथे झालेल्या जिल्हास्तरींय कुस्ती स्पर्धेत शिवराज विद्यालयाची कु. यश राजनंदीनी विकास पाटील ६२ किलो प्रथम , कु.प्रतीभा गोविंद चव्हाण ७३कि. प्रथम , कु.पायल महेश पाटील ४२ कि.द्वीतीय, प्रिती शरद चांदने ३० कि. द्वितीय क्रमांक पटकावला .या खेळाडूंची निवड विभागीय स्पर्धेसाठी झाली. विद्यार्थी त्यांचा सत्कार वारणा शिक्षण संस्थेचे सचिव. डाॅ. प्रताप पाटील यांनी केला .
सांगली येथे क्रिडा संकुल सांगली येथे पार पडलेल्या तायक्योदा क्रिडा प्रकारात कु.रमेश पाटील याला प्रथम क्रमांक पटकविला याचा ही यावेळी सत्कार करण्यात आला. त्यांची सातारा क्रिडा संकुलात विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली.
खेळाडूंना मार्गदर्शन व्हि.के पुजारी , मुख्याद्यापक जे. आर . शेटे, डि.डि. पाटील यांचे मार्ग दर्शन लाभले.
0 Comments