BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

वाढदिवसा निमित्त शिराळा येथे आज शिवाजीराव देशमुख साहेबांचा अभिष्टचिंतन सोहळा

वाढदिवसा निमित्त शिराळा येथे आज आम.शिवाजीराव देशमुख साहेबांचा अभिष्टचिंतन सोहळा 
शिराळा,ता.१३: विधानपरिषदेचे माजी सभापती आमदार शिवाजीराव देशमुख यांच्या वाढदिवसाच्यानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती श्री.शिवाजीराव देशमुख वाढदिवस गौरव समितीचे अध्यक्ष हणमंतराव पाटील व तालुका कॉंग्रेस अध्यक्ष आनंदराव पाटील यांनी दिली.
   यावेळी बोलताना ते म्हणाले, उद्या गुरुवारी रोजी दुपारी १ वाजता शिराळा येथे अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमाला माजी खासदार मा.कल्लाप्पाण्णा आवाडे,  सांगली जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष .आमदार मोहनराव कदम, वसंतदादा पाटील साखर कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील उपस्थित राहणार आहे. रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर, पशुवैद्यकीय शिबीर यांच्यासह विविध गावामध्ये अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत.


Post a Comment

0 Comments