BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

जखमी नागावर उपचार

शिराळा :जखमी अवस्थेतील नागावर उपचार करताना शिराळा येथील चव्हाटा नागराज मंडळाचे कार्यकर्ते.
जखमी नागावर उपचार 
शिराळा,ता.११:शिराळा येथील युवकांनी जखमी नागावर तातडीने उपचार करून त्यास जीवदान दिले. नाग आणि शिराळकरांचा अतूट नाते आहे. शिराळकरांनी नागप्रेम सिद्ध केले.
 रेड (ता. शिराळा ) या ठिकाणी जखमी अवस्थेत नाग आढळून आल्याची महिती नायकुडपुर येथील चव्हाटा नागराज मंडळा च्या कार्यकर्त्यांना समजली.त्यावेळी  शिराळा मधील नागप्रेमी त्या ठिकाणी पोहचले. त्यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली.वन विभागाच्या देखरेखीखाली लेखी पत्र घेऊन त्यांनी नागास पशु वैद्यकीय हॉस्पीटल इस्लामपुर (ईश्वरपूर) येथे दाखल करून नागाचा एक्सरे काढला. सलाईन लावले.त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाल्या नंतर त्यास वन विभागाच्या देखरेखीखाली सोडण्यात आले. यासाठी  बंटी नांगरे-पाटील,पुथ्वीराज शिंदे,मनोज खबाले,विकी इंगवले,शिवराज नांगरे-पाटील,रणजित शिंदे,योगेश कदम,दिग्विजय शिंदे,अजिंक्य धुमाळ,ओंकार गायकवाड,सत्यजित शिंदे यांनी प्रयत्न केले.

Post a Comment

1 Comments