BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

लौंगीक अत्याचार करणा-या डॉं. पवारला सात दिवसाची कोठडी

आश्रमशाळेत अल्पवयीन मुलींवर झालेल्या लौंगीक अत्याचाराचे. तीव्र पडसाद उमटले. संतप्त ग्रामस्थांनी डॉं अरविंद पवार याच्या आश्रमशाळेतील  कार्यालयाची तोडफोड केली.महिलांनी आश्रमशाळेच्या कार्यालयात घुसून मुख्याध्यापक सुरेश साळुंखे यांना मारहाण केली.३ ऑक्टोंबर पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली  

लौंगीक अत्याचार करणा-या डॉं. पवारला सात दिवसाची कोठडी

शाळेतील कार्यालयाची तोडफोड;मुख्याध्यापकास महिलांचा चोप

 कुरळप ता. वाळवा  येथील  मिनाई आश्रमशाळेत अल्पवयीन मुलींवर झालेल्या लौंगीक अत्याचाराचे. तीव्र पडसाद उमटले. संतप्त ग्रामस्थांनी डॉं अरविंद पवार याच्या आश्रमशाळेतील  कार्यालयाची तोडफोड केली.महिलांनी आश्रमशाळेच्या कार्यालयात घुसून मुख्याध्यापक सुरेश साळुंखे यांना मारहाण केली.३ ऑक्टोंबर पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. 
आक्रमक ग्रामस्थांनी  पवार याच्या निषेधार्थ गावातून मोर्चा काढुन त्याच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे तिरडी काढुन दहन केले..या प्रकरणात जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. ग्रामस्थांच्या आक्रमक पवित्र्यामुळे गावात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर गावात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी कुरळपला भेट देवुन माहिती घेतली.
 मिनाई आश्रमशाळेतल्या अल्पवयीन मुलींवर घडलेल्या लैंगिक अत्याचाराचे संतप्त पडसाद उमटत आहेत. आज सकाळी कुरळप ग्रामस्थांनी मिनाई आश्रमशाळेवर हल्लाबोल करत कार्यालयाची तोडफोड केली आहे. या घटनेनंतर काही वेळातच आश्रमशाळेवर गावातील महिला आणि काही सामाजिक संघटनांच्या महिलांनी  आश्रमशाळेच्या कार्यालयात घुसून मुख्याध्यापक सुरेश साळुंखे यांना चप्पल, लाथाबुक्क्यांनी व खुर्च्याने बेदम चोप दिला. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करत मुख्याध्यापकाला ताब्यात घेतले.

Post a Comment

0 Comments