BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

आज सभापती,उपसभापती निवड

शिराळा,ता.७: कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती,उपसभापती निवड आज (शुक्रवारी) सकाळी ११ वाजता होणार असून सभापतीपदा साठी कॉंग्रेसच्या सुजित देशमुख तर उपसभापतीपदासाठी राष्ट्रवादीच्या बाबासो पाटील व नंदा पाटील यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. सभापतीपदासाठी सुजित देशमुख यांची निवड निश्चित मानली जात आहे.
 सभापती सुरेश पाटील व उपसभापती सुभाष पाटील यांनी तीन वर्षाचा कार्यकाल संपल्याने राजीनामा दिला असल्याने नवीन सभापती ,उपसभापतीची उत्सुकता तालुक्यातील लोकांना लागली आहे.
बाजार समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार मानसिंगराव नाईक व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सत्यजित देशमुख यांची सत्ता आहे.दोन भाऊंनी आघाडी करून सत्ता मिळवली होती.गत निवडणुकीत कॉंग्रेसच्या हिंदुराव बसरे यांना सभापती व राष्ट्रवादीच्या मंगल पाटील यांना उपसभापतीची संधी देण्यात आली होती. यावेळी प्रथम राष्ट्रवादीला सभापती पद देण्यात आले असल्याने सुरेश पाटील यांची सभापतीपदी तर कॉंग्रेसच्या सुभाष पाटील यांची उपसभापती पदी निवड करण्यात आली होती.तीन वर्षा नंतर काँग्रेसला सभापती व राष्ट्रवादीला उपसभापती पद देण्याचा निर्णय झाला होता.त्यानुसार सभापती व उपसभापती यांनी राजीनामे दिल्याने उद्या सभापती, उपसभापती निवड होत आहेत. आत्ता आपल्या विभागात सभापती व उपसभापती पद मिळावे यासाठी दोन्ही काँग्रेस कार्यकर्त्यांची धडपड सुरु झाली असली तर अंतिम निर्णय हा मानसिंगराव नाईक व सत्यजित देशमुख या दोन भाऊंचा असणार आहे. त्यामुळे काँग्रेसचा सभापती व राष्ट्रवादीचा उपसभापती कोण याकडे तालुक्याच्या नजरा लागून राहिल्या आहेत.

Post a Comment

0 Comments