BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शिराळ्यात उद्या बुधवारी महाडीक युवा शक्तीची लाखाची दहीहंडी: सम्राट महाडीक


शिराळा:  येथील भुईकोट किल्ला येथे दहीहंडीसाठी उभारण्यात येणाऱ्या गॅलरीची पाहणी करताना युवा नेते सम्राट महाडीक सोबत नगरसेवक केदार नलवडे
दहीहंडी साठी पाच हजार प्रेक्षक बसतील अशी भव्य गॅलरी उभारण्याचे काम सुरु आहे






शिराळ्यात उद्या बुधवारी  महाडीक युवा शक्तीची लाखाची दहीहंडी: सम्राट महाडीक
राजकीय नेत्यांसह सिनेतारकांची हजेरी
शिराळा: महाडिक युवा शक्ती मार्फत मानाची १ लाख ३हजार ३ रुपये बक्षिसाची दहीहंडी उद्या बुधवार.५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता भुईकोट किल्ला येथे होणार आहे.  या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन महाडीक युवा शक्तीचे सम्राट महाडीक यांनी केले. भुईकोट किल्ला येथे कार्यक्रमाच्या नियोजन पाहणी प्रसंगी बोलत होते.
 यावेळी महाडीक म्हणाले की, या वर्षी माजी मुख्यमंत्री नारायण राणे , राज्य मंत्री सदाभाऊ खोत, खासदार धनंजय महाडिक, आमदार नितेश राणे, आमदार अमन महाडिक याच बरोबर स्थानिक सर्व पक्षाचे नेते व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. यावेळी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही दहीहंडी होणार आहे .गोविंदाना दुखापत होऊ नये यासाठी प्रथमच हेल्मेट , क्रेन-सेफ्टी बेल्ट, आरोग्य पथक , रुग्णवाहिका त्याच बरोबर पाच हजार पुरुष व महिला प्रेक्षकांना बसण्याची व्यवस्था असणाऱ्या गॅलरीची सोय करण्यात आली आहे. मनोरंजन कार्यक्रमासाठी सिने कलाकार मानसी नाईक , ऐश्वर्या साळवी , लावणी फेम तन्वी कोलपे तसेच इतर सिने व टी व्ही कलाकार, डान्स ग्रुप  उपस्थित राहणार आहेत.कोल्हापूर , मुंबई, पुणे, तासगाव, शिरोळ आदी ठिकाणची गोविंदा पथके येणार आहेत.
 यावेळी उत्कृष्ट थराची सलामी देणाऱ्या पथक, उत्कृष्ट मनोरा , उत्कृष्ट चढाई याना बक्षीस तसेच दहीहंडी फोडणार्या पथकास १लाख ३ हजार ३ रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे.
   २००६ ला या पश्चिम महाराष्ट्रात पहिल्यांदा महाडिक युवा शक्ती मार्फत ही दहीहंडी चालू केली आहे यास मोठा प्रतिसाद मिळत आहे.
यावेळी नगरसेवक केदार नलवडे ,राम जाधव यांच्यासह शिराळा व वाळवा तालुक्यातील महाडीक युवा शक्तीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments