शिराळा: महाराष्ट्र आशा वर्कर्स युनियन व निवारा बांधकाम कामगार संघटनेच्यावतीने आपल्या मागणीचे निवेदन नायब तहसीलदार सुहास घोरपडे यांना देण्यात आले.
महाराष्ट्र आशा वर्कर्स युनियन व निवारा बांधकाम कामगार संघटनेच्यावतीने तहसील व पंचायत कार्यालया समोर निदर्शने
रेशन बंद करून रोख अनुदान देण्याच्या शासनाच्या जी.आर. ची होळी
शिराळा,ता ७: प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत त्वरित घरे मिळावी, सरकारी जमिनीवर बांधलेली सर्व घरे नियमित करा.घरासाठी जमीन नसणाऱ्यांना जागा द्या, या मागणीसाठी शिराळा तहसील व पंचायत समिती समोर महाराष्ट्र आशा वर्कर्स युनियन व निवारा बांधकाम कामगार संघटनेच्यावतीने निदर्शने करण्यात आली.शिष्टमंडळाचे वतीने नायब तहसीलदार सुहास घोरपडे व पंचायत समितीचे प्रभारी सहायक गटविकास अधिकारी आर.एस.माने यांना आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
यावेळी शंकर पुजारी म्हणाले, शिराळा तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजनानुसार हजारो घरे मंजूर आहेत.पण त्यांना जागा नाही. त्यांना जागा देण्यासाठी दिनदयाळ योजना आहे. पण अद्याप त्यासाठी शासन आदेश असूनही कमिटी नेमलेले नाही. त्यामुळे योजना असूनही जमीन मिळत नाही. महाराष्ट्र आशा वर्कर्स युनियन व निवारा बांधकाम कामगार संघटनेच्यावतीने १२ सप्टेंबर रोजी घरे जागा मागणीसाठी इस्लामपुर प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.त्यासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचे आवाहन पुजारी यांनी केले.
तहसीलदार कार्यालय समोर रेशन बंद करून रोख अनुदान देण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या जी.आर. ची होळी करण्यात आली.
या आंदोलनचे नेतृत्व कॉ.शंकर पुजारी. सुमनताई पुजारी यांनी केले.यावेळी अंजली पाटील,विद्या कांबळे, वर्षां गडाचे, लादेवाडीचे सरपंच श्रीकांत खोत,दादासाहेब बुद्रूक, बाळासाहेब कोल्हे, गजानन होनमोरे, बाळासाहेब सुतार हे उपस्थित होते.
0 Comments