उद्याच्या व्यापार बंद मध्ये शिराळचे व्यापारी सहभागी
व्यापारी संघटनेचे सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील घोंगडे यांना निवेदन
वॉलमार्ट, फ्लिपकार्ट यासारख्या परदेशी व्यापारी संस्थांना मान्यता देऊन केंद्र सरकार देशातील लहान , मोठया दुकानदारांविरुद्ध व्यापारी धोरणे राबवत असल्याचा आरोप करत उद्या शुक्रवार दि.२८ रोजी होणाऱ्या व्यापार बंद मध्ये सर्व व्यापारी सहभागी होणार असल्याचे निवेदन शिराळा तालुका व्यापारी संघटनेने पोलीस निरीक्षक स्वप्नील घोंगडे यांना दिले.या निवेदनात या केंद्र सरकारच्या धोरणामुळे सर्व प्रकारच्या लहान , मोठा व्यापार उद्धवस्त होणार आहे त्यामुळे व्यापाऱ्यांवर उपासमारीची वेळ येणार आहे. त्यामुळे तालुक्यातील किराणा , भुसार , हार्डवेअर, औषध , कापड , जनरल आदी सर्व व्यापार बंद ठेऊन बंद ठेवण्यात येणार आहे. यावेळी संघटनेचे अध्यक्ष अमोल पारेख , उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव , अविनाश चितुरकर , सुनील कदम आदी उपस्थित होते.
0 Comments