घरगड्यानेच केली चोरी
फुफिरे ( ता.शिराळा) येथे घरगाड्याने दहा हजार रुपये रोख व दीड तोळे सोन्याचे दागिने असा ६० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना शनिवार दि.२२ रोजी घडली असून आज शुक्रवारी याबाबत शिराळा पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.याबाबत अनुसया बाबुराव गायकवाड याच्या घरात संतोष दिलीपराव उविके व सविता संतोष उविके हे दोघे पाच वर्षांपासून शेती कामासाठी करारावर काम करत होते.शनिवार दि. २२ रोजी सायंकाळी ६ पूर्वी दोघे घरातील दहा हजार रुपये रोख व दीड तोळ्यांची माळ चोरून पळून गेल्याचे समजले, यानंतर त्याचा शोध घेतला मात्र दोघे सापडले नाहीत त्यामुळे आज याबाबत शिराळा पोलिसात घरगडी संतोष उविके व सविता उविके यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार शिवाजी पाटील हे करीत आहेत.
0 Comments