BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शिराळा तालुक्यात स्वाईन फ्लुचा तिसरा बळी

शिराळा तालुक्यात स्वाईन फ्लुचा तिसरा बळी

अाक्काताई  खोत यांचा मृत्यू

शिराळा,ता.२१:  औंढी ( ता.शिराळा) येथील अक्काताई कुंडलिक खोत ( वय ५८ )या महिलेचा स्वाइन फ्लू ने मृत्यू झाला असून आतापर्यंत तालुक्यातला हा तिसरा बळी आहे.
तालुक्यात स्वाईन फ्लू व निमोनियाने थैमान घातले असल्याने लोकांच्यात भीतीचे वातावरण तयार झाले आहे.
 वाकुर्डे -जाधववाडी व मांगरुळ येथे दोघांचा निमोनिया ने मृत्यू झाला आहे.
  याबाबत तालुका आरोग्य अधिकारी डॉ.नरेंद्र घड्याळे यांनी सांगितले की,औंढी धुरंदरेवाडी येथील अक्काताई खोत यांचा कोल्हापूर येथे सिपीआर रुग्णालयात उपचार चालू असताना आज सायंकाळी ६:३० ला मृत्यू झाला आहे.तसेच कोल्हापूर येथे उपचार सुरू असताना वाकुर्डे बुद्रुक येथील भीमराव केशव जाधव ( वय ५८) ,तसेच मांगरूळ येथील नंदा खांडेकर यांचा निमोनिया ने मृत्यू झाला आहे. आणखी दोन रुग्ण उपचारासाठी कोल्हापूर येथे  दाखल करण्यात आले आहेत.
तिघीही महिलाच
स्वाईन फ्लूने बळी गेलेल्या सत्वशीला निकम(शिराळा) शालन कुंभार(मांगरुळ) आक्काताई खोत(औंढी)या महिलांचा स्वाईन फ्लूने बळी गेला आहे.

Post a Comment

0 Comments