शिराळा:येथे महाडीक युवा शक्तीच्यावतीने आयोजित दहीहंडी कार्यक्रमात बोलताना डॉ.निलेश राणे सोबत खासदार धनंजय महाडीक, नानासाहेब महाडीक, राहुल महाडीक,सम्राट महाडीक,केदार नलवडे.
स्वाभिमानी संघटनेच्या यादीत पहिला आमदार सम्राट महाडीक असेल: डॉ. निलेश राणे
शिराळा,ता: स्वाभिमानी संघटनेच्या यादीत पहिला आमदार म्हणून सम्राट महाडीक यांचे नाव असेल असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव डॉ.निलेश राणे यांनी केले.शिराळा येथे महाडीक युवा शक्तीच्यावतीने आयोजित दहीहंडी कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी ते म्हणाले, दहीहंडीला असणारा जोश तरुणांनी २०१९ च्या विधानसभेच्या विजया पर्यंत कायम ठेवावा. आमच्या राणे कुटुंबियांच्या आयुष्यात अनेक चढउतार आलेत; अजून हि संघर्षमय वाटचाल सुरु आहे.अशा परीस्थितीत आमच्या पाठीशी महाडीक कुटुंबीय खंबीरपणे उभे आहे. संघर्षात कधीही साथ सोडायची नसते हे महाडीक कुटुंबियांनी कृतीतून दाखवले आहे.त्यामुळे मी त्यांच्या ऋणात आयुष्यभर राहील. आमच्या स्वाभिमानी संघटनेच्या यादीतील पहिला आमदार सम्राट महाडीक असतील.त्यामुळे युवकांनी त्यांच्या पाठीशी ठाम रहावे.२०१९ची हंडी आपलीच असणार.
0 Comments