शिवाजी जाधव |
शिवाजीच्या खून प्रकरणी पाच दिवसाची पोलीस कोठडी
शिराळा,ता.२२:जांभळेवाडी(ता.शिराळा)येथील शिवाजी मधुकर जाधव(वय ३४)या युवकाच्या खून प्रकरणी अटक केलेल्या पाच जणांना आज शिराळा न्यायालयात हजर केले असता बुधवारी २६ सप्टेंबर पर्यंत पाच दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.शिवाजीच्या खुन प्रकरणी पोलीसांनी संशयित म्हणुन शुक्रवारी महादेव रामचंद्र सपकाळ (जांभळेवाडी),गौसुल अजमसलीम दिवाण (शिराळा), अभिजित आनंदा कांबळे (इंगरुळ),रोहित संजय गायकवाड(शिराळा)गणेश बाजीराव यादव (इंगरुळ) यांना अटक केली होती.
जांभळेवाडी येथील महादेव सपकाळ यांच्या पत्नीशी शिवाजीचे अनैतिक संबंध असल्याने त्याने शिवाजीच्या खूनासाठी गौसुल दिवाणला चार लाखाची दिली होती.त्यापैकी एक लाख वीस हजात आदी दिले होते.गौसुलने शिवाजीला फोन करून जेवणाचे व दारू पिण्याचे निमंत्रण अभिजित,रोहित,गणेश या मित्रांच्या मदतीने त्याचा खून केला.त्यास मोटरसायकलसह मांगले रस्त्यावरील गोरक्षनाथ मंदिर जवळील तोरणा नदीच्या पुलाजवळ फेकुन दिले.त्याच्या डोक्यात दगड घालून तो मयत झाल्याची खात्री करुन घरी परतले.पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील घोंगडे करत आहेत.
0 Comments