BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शिवाजी जाधवचा अपघाती मृत्यू नसून अनैतिक संबंधातून खून


मयत शिवाजी जाधव

शिवाजी जाधवचा अपघाती मृत्यू नसून अनैतिक संबंधातून खून

शिराळा,ता.२१:जांभळेवाडी (ता.शिराळा )येथील शिवाजी मधुकर जाधव (वय ३४)या युवकाचा झालेला मृत्यू अपघाती नसून अनैतिक संबंधातून खून झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.
संशयित म्हणुन महादेव रामचंद्र सपकाळ( वय ३६ रा.जांभळेवाडी),गौसुल अजमसलीम दिवाण ( वय २६ रा.शिराळा), अभिजित आनंदा कांबळे (वय २३, मूळ रा.इंगरुळ ,सध्या रा.शिराळा),रोहित संजय गायकवाड ( वय २२, रा.शिराळा) गणेश बाजीराव यादव ( वय२१ ,रा.इंगरुळ) यांना अटक करण्यात आली आहे.
     हा अपघात नसुन खून असल्याची तक्रार फिर्यादी शंकर सदाशिव जाधव यांनी केली होती.यावरून पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला. मयत शिवाजी यांच्या मोबाईलवर एका नंबरवरून वारंवार फोन येत होते. त्यामुळे या व्यक्ती बाबत संशय येऊ लागला.यानंतर पोलीस निरीक्षक स्वप्नील घोंगडे तसेच पोलीस प्रकाश पवार , अमोल शिंदे, रणजित टोमके, संजय माने,अरुण कानडी यांनी गौसुल दिवाण व अभिजित कांबळे यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले.
   जांभळेवाडी येथील महादेव सपकाळ यांच्या पत्नीशी मयत शिवाजी याचे अनैतिक संबंध होते. त्यामुळे आठ महिन्यांपूर्वी महादेव याने गौसुल दिवाण यास बोलावून तू शिवाजीचा खून कर पण तो अपघात वाटला पाहिजे असे सांगीतले. यानंतर गौसुल ने शिवाजीचा काटा काढण्यासाठी अभिजित कांबळे यास मदतीसाठी घेतले. पहिला प्रयत्न सहा महिन्यांपूर्वी केला पण शिवाजीची मोटरसायकल वेगाने निघून गेल्याने तो प्रयत्न फसला.
   शनिवार दि १५ सप्टेंबर रोजी त्याने शिवाजीला फोन करून जेवणाचे व दारू पिण्याचे निमंत्रण दिले.गौसुल,अभिजित,रोहित,गणेश यांनी त्यास दारू पाजली.त्यानंतर अभिजित रहात असलेल्या खोलीवर नेवुन पुन्हा दारू पाजुन जेवण केले.मध्यरात्री १ ते २.३० च्या दरम्यान शिवाजीच्या तोंडावर उशी दाबून त्यास बेशुद्ध केले.यावेळी शिवाजी मयत झाला की बेशुद्ध झाला हे त्यांना समजले नाही.नंतर शिवाजीच्या मोटरसायकलवरून मध्यरात्री २ ते २:३० च्या दरम्यान अभिजित व रोहित ने त्यास मांगले रस्त्यावरील गोरक्षनाथ मंदिर जवळील तोरणा नदीच्या पुलाजवळ आणले.गौसुल दिवाण व गणेश यादव हे दोघे पुलाच्या दोन्ही बाजूला थांबले होते.शिवाजी यास पुलावरून खाली फेकुन मोटरसायकल रेस करून पुलावरूनखाली ढकलली.यानंतर त्यात्या डोक्यात दगड घालून तो मयत झाल्याची खात्री पटल्यावर सर्व घरी परतले.पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील घोंगडे करत आहेत.
                                                                     ४ लाखाची सुपारी
    महादेवने गौसुलला चार लाख रुपयांची सुपारी देवुन यांपैकी १ लाख २० हजार रुपये आदी दिले.

Post a Comment

2 Comments

  1. बाईची मजा



    किती कुटुंबांना सजा

    ReplyDelete