BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

जागतिक जैव विविधता संरक्षण परिषदेसाठी देशातून शिराळच्या प्रणव महाजन यांची निवड

जागतिक जैव विविधता संरक्षण परिषदेसाठी देशातून शिराळच्या प्रणव महाजन यांची निवड
शिराळा,ता.१९:  इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगलोर या ठिकाणी आयोजित केलेल्या जागतिक जैवविधता संरक्षण परिषदेसाठी शिराळा येथील  प्रणव महाजन यांची निवड झाली आहे.
देशातून निवडलेल्या पंधरा उमेदवारांमध्ये प्रणव याचा समावेश आहे . २४ ते ३० सप्टेंबर या कालावधीमध्ये होणाऱ्या या जागतिक परिषदेसाठी आशिया आणि आफ्रिका तसेच संपूर्ण जगातून संशोधक , विविध जागतिक , राष्ट्रीय संस्था सहभागी होणार आहेत . प्रणव महाजन  उत्तर पश्चिम घाट संवर्धन करण्यासाठी कोणत्या उपाययोजना जागतिक स्तरावरून राबवण्यात येतील याचा संक्षिप्त आढावा येथे घेणार आहेत . तसेच प्लॅनेट फाऊंडेशन फाऊंडेशनच्या माध्यमातून विविध संशोधनावर आधारित पश्चिम घाट संवर्धनाचे प्रकल्प राबवण्याचा प्रयत्न राहणार आहे .जगातील अतिसंवेदनशील पर्यावरणीय भागांमध्ये पश्चिम घाट मोडतो . उत्तर पश्चिम घाटामध्ये कमी होत असणार्या वाघांची संख्या , जंगलाचे  आकुंचन , रासायनिक शेती , नद्यांचे आकुंचन , खाणकाम , चोरटी शिकार , वृक्षतोड , वणवे ,इत्यादी विविध समस्यांवर काम करण्यासाठी या परिषदेची मदत होणार आहे . देशामध्ये आतापर्यंत पश्चिम घाट आणि देशातील विविध जंगलांमध्ये मोठय़ा प्रमाणात संशोधन आणि विविध अहवाल तयार झाले आहेत. परंतु याचा प्रत्यक्ष संरक्षणासाठी वापर कशा पद्धतीने करता येईल याचा अभ्यास या ठिकाणी होणार आहे .

Post a Comment

0 Comments