BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

प्रवीण डाकरे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षकरत्न पुरस्कार प्रदान

प्रवीण डाकरे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षकरत्न पुरस्कार प्रदान
शिराळा,ता.१६:जि.प.शाळा ढाणकेवाडी (ता.शिराळा)चे उपशिक्षक प्रविण डाकरे यांना देवदान बहुउद्देशीय सेवाभावी संस्था कुपवाड यांचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षकरत्न पुरस्कार आज सांगली येथे प्रदान करण्यात आला.
 तंत्रज्ञानाचा वापर करुन कमी वयात शिक्षणप्रक्रियेत नवनवीन प्रयोग केल्याबद्दल डाकरे यांच्या कार्याची विशेष नोंद घेऊन हा पुरस्कार जाहीर करण्यात आला होता.
यापूर्वी डाकरे यांना बेस्ट व्हिडिओ प्रोग्राम नॅशनल अॅवाॅर्ड (लेझीम),राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार, राज्यस्तरीय शिक्षण माझा वसा युवा पुरस्कार,युट्यूब टाॅप टेन स्पेशल टीचर अॅवाॅर्ड ,शिक्षकरत्न पुरस्कार ,शिवरत्न पुरस्कार या सहा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
हा पुरस्कार वितरण सोहळा उपजिल्हाधीकारी अमृतजी नाटेकर, ज्येष्ठ साहीत्यिक वैजनाथ महाजन, कथाकथनकार बाबा परीट, महापौर सौ. संगिता खोत, पुरोगामी शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष मा. प्रसाद पाटील, माजी नगरसेवक शेखर माने, नगरसेविका सौ. कल्पना कोळेकर, जनविकास प्रतिष्ठाणचे संस्थापक हरिदास लेंगरे, माजी नगरसेवक शिवराज बोळाज, माजी नगरसेवक विठ्ठल तात्या खोत, भाजप शहर अध्यक्ष दरीबा बंडगर यांच्या प्रमुख उपस्थित पार पडला.
स्वागत सचिव अजिंक्य मोहिते यांनी तर प्रास्ताविक अध्यक्ष अनिल मोहिते यांनी केले. अलिशा मोहिते यांनी सूत्रसंचालन केले.
आभार धोंडीराम पवार यांनी मानले.
कुपवाड: देवदान बहुउद्देशीय सेवाभावी संस्था कुपवाड यांचेवतीने राज्यस्तरीय आदर्श शिक्षकरत्न पुरस्काराचे वितरण  करण्यात आले.
पुरस्कार प्राप्त शिक्षक-
रजनीकांत भीमराव बल्लाळ(श्री.रेणुका विद्यामंदिर कोकळे),शशिकांत दादासो सुतार (औद्योगिक प्रशिक्षण संस्था सांगली), प्रा. शितल सुरेश गुंजाटे (पी.व्हि.पी.आय.टी. बुधगाव, सांगली),पांडुरंग मारुती चव्हाण (ल.कि.विद्यामंदिर पलुस, सांगली), प्रल्हाद रघुनाथ जाधव (क्रां.वि.दा.सावरकर विद्यामंदिर चिणके, सोलापुर), लक्ष्मी बाजीराव पाटील (जि.प. विद्यामंदिर माडेकरवाडी, कोल्हापुर), दादु किसन गावडे (कन्या विद्यामंदिर कोथळी, कोल्हापुर), गुंडा भिमा मुंजे (जि.प. शाळा जत्तीवस्ती संख, सांगली), बाळू बबन गायकवाड (जि.प. शाळा नं. २ कुपवाड, सांगली), सौ. अशोका प्रतापराव पाटील (आर.जे.एस.पी. महाविद्यालय ढवळी),सौ. देविना निमिश माने (मुख्याध्यापिका, स्कायलार्क इंग्लिश स्कूल सांगली), प्रा. विनोद श्रीपाल चौगुले (व्हि.टी.सी. पाटगाव मिरज), मार्तंड आनंदा ब्रम्हनाळकर (जि.प. शाळा यशवंतनगर),
विशेष राज्य शिक्षकरत्न पुरस्कार
प्रा.डाॅ. दादा पांडुरंग नाडे (युवा वैज्ञानिक शिक्षक),संजय घोडावत विद्यापिठ
 प्रविण दत्तात्रय डाकरे* *(राज्यस्तरीय तंत्रस्नेेही शिक्षक) (जि.प. शाळा ढाकणेवाडी शिराळा)
*राज्यस्तरीय आदर्श केंद्रप्रमुख पुरस्कार*
मा. शशिकांत मारुती नागरगोजे
(केंद्रप्रमुख- कुपवाड केंद्र, ता. मिरज)

Post a Comment

0 Comments