BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शिराळ्यात स्वाईन फ्लूचा पहिला बळी

                    सौ.सत्वशीला निकम
शिराळ्यात स्वाईन फ्लूचा पहिला बळी 
शिराळा,ता.१३: शिराळा येथील सौ. सत्वशिला मारुती निकम ( वय ४२) रा. निकम वस्ती या महीलेचा कराड येथे उपचार सुरू असताना स्वाईन फ्लू ने मृत्य झाला. सत्वशीला स्वाईन फ्लूच्या तालुक्यात पहिल्या बळी ठरल्या आहेत.
याबाबत समजलेली माहिती अशी, सत्त्वशीला यांना आठ दिवस पुर्वी कृष्णा हॉस्पिटलमध्ये स्वाइन फ्लू ची लागण झाल्या मुळे दाखल करण्यात आले होते. २० आॅगस्ट रोजी शिराळा येथे भजनी मंडळाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी सत्त्वशीला यांना ताप आल्याने खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. प्रकृतीत सुधारणा न झाल्याने कराड येथे दाखल करण्यात आले.
 रक्ताची तपासणीत स्वाईन फ्लु ची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्या घरातील शिवम सचिन निकम (वय -2 वर्षे) व सानवी संदीप निकम (वय-6 वर्षे) यांच्यावर उपचार सुरु होते. सध्या शिवमवर उपचार सुरु असून सानवी ला उपचार करून घरी सोडण्यात आले.  सत्वशीला यांच्या पश्चात दोन मुले, पती असा परिवार
आहे. शिराळा शहरातील स्वाईन फ्लू चा पहिलाच बळी असल्याने शहरातात घबराटीचे वातावरणात पसरले आहे.


Post a Comment

2 Comments