महावीर स्वामी जन्म कल्याणक दिवस उत्साहात साजरा
शिराळा: येथील जैन श्वेतांबर मूर्तिपूजक संघामार्फत मोठया उत्साह हात श्री महावीर स्वामी जन्म कल्याणक दिवस साजरा करण्यात आला यावेळी घेण्यात आलेल्या गवळी स्पर्धेत पुरुष गटात भरत जैन , महिला गटात चांदणी शहा, लीना जैन , अर्चना पारेख तसेच लहान गटात मोहित पारेख , तन्वी जैन यांनी पहिला क्रमांक पटकावला.
पर्व पर्युषण निमित्त संघा मार्फत स्नात्र पूजा , भावना , आरती करण्यात आली यावेळी सागर शहा , मलय शहा, प्रणव शहा, अनिष शहा यांनी जैन धर्माचे महत्त्व, श्री महावीर स्वामीचे जीवन चरित्र सांगणारे कल्पसूत्र वाचन केले .यावेळी संपूर्ण शहरातून प्रभात फेरी तसेच दुपारी श्री महावीर स्वामी पाळण्याची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. तसेच मंदिर मध्ये महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संपूर्ण मंदिर दिव्यांच्या रोषणाईने उजळून निघाले होते.
गवळी स्पर्धा , लहान मुलांचे तसेच अबाल वृद्धांचे साठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.या प्रसंगी नटवरलाल शहा , सूर्यकांत शहा , कुमार पारेख ,राजीव पारेख, अरविंद ओसवाल , राजेंद्र शहा , अतुल पारेख ,नरेश ओसवाल, भारत जैन , इंदर ओसवाल, विनील शहा ,प्रकाश गांधी आदी उपस्थित होते. श्री आचिरा महिला मंडळाने विविध भक्तीपर गाणी गायली.
0 Comments