प्रवीण डाकरे
प्रविण डाकरे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षकरत्न पुरस्कार जाहीर
शिराळा,ता.१०:जि.प.शाळा ढाणकेवाडी (ता.शिराळा)चे उपशिक्षक प्रविण डाकरे यांना देवदान बहुउद्देशीय सेवाभावी संस्था कुपवाड यांचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षकरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे.या संस्थेच्यावतीने शिक्षक दिनानिमित्त १२ शिक्षकांना हा पुरस्कार देण्यात येतो. तंत्रज्ञानाचा वापर करुन कमी वयात शिक्षणप्रक्रियेत नवनवीन प्रयोग केल्याबद्दल डाकरे यांच्या कार्याची विशेष नोंद घेऊन हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा १६ सप्टेंबर रोजी सांगली येथे होणार असल्याची माहिती संस्था सचिव अजिंक्य मोहिते यांनी दिली आहे.यापूर्वी डाकरे यांना बेस्ट व्हिडिओ प्रोग्राम नॅशनल अॅवाॅर्ड (लेझीम),राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार, राज्यस्तरीय शिक्षण माझा वसा युवा पुरस्कार,युट्यूब टाॅप टेन स्पेशल टीचर अॅवाॅर्ड ,शिक्षकरत्न पुरस्कार ,शिवरत्न पुरस्कार या सहा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
4 Comments
अभिनंदन
ReplyDeleteAbhinandan sir
ReplyDeleteगुरुजी।।।अमित सरांकडून अनंत सदिच्छा व ।अभिनंदन
ReplyDeleteअभिनंदन......
ReplyDelete