इसरोत देशातून प्रथम क्रमांकाने निवड झालेल्या अक्षय खामकर याना आनंदराव नाईक पुरस्काराचे वितरण करताना डॉ. इंद्रजीत देशमुख. शेजारी मानसिंगराव नाईक, अमरसिंह नाईक, राम पाटील.
|
आनंदराव नाईक पुरस्कार वितरण समारंभात बोलताना जेष्ठ विचारवंत डॉ. इंद्रजीत देशमुख. शेजारी माजी आमदार मानसिंगराव नाईक व इतर मान्यवर.
|
स्वतः:मधली क्षमता ओळखा यश निश्चित मिळेल; जेष्ठ विचारवंत डॉ. इंद्रजीत देशमुख
आनंदराव नाईक गुणवत्ता पुरस्कार वितरण
शिराळा (प्रतिनिधी ) : स्वत:मधली क्षमता ओळखा. दृढनिश्चय करून वाटचाल करा. निश्चित यशप्राप्ती मिळेल, असे प्रतिपादन जेष्ठ विचारवंत डॉ. इंद्रजीत देशमुख यांनी केले.
भाटशिरगाव (ता. शिराळा) येथे थोर स्वातंत्र्य सेनानी आनंदराव नाईक यांच्या ११३ व्या जयंती निमित्ताने गुणवत्ता पुरस्कार वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. 'विश्वास' उद्योग समूहाचे प्रमुख, माजी आमदार मानसिंगराव नाईक अध्यक्षस्थानी होते.
डॉ. देशमुख म्हणाले, स्पर्धेचे युग आहे, हे विसरू नका. स्वतःला ओळखा. ध्येय निश्चित करा. कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्याची तयारी ठेवा. स्वतःमधील क्षमता सिद्ध करा. एक लक्षात ठेवा की, स्पर्धा परीक्षा देण्याआड जात, धर्म, गरिबी येत नाही. आयुष्यात महत्त्वाचे दोन टप्पे येतात ते म्हणजे घडणे आणि बिघडणे. तुम्ही काय करायचे ते ठरवा. लाखात एक होऊ नका. लाखाचा पोशिंदा व्हा.
ते म्हणाले, करियरच्या बाबतीत विचीत्र गणिते आहेत. त्यामुळे ज्याला जे मिळवायचे आहे त्यासाठी मी कोण आहे. माझ्यामध्ये कोणती क्षमता आहे. हे ओळखूनच पाउले टाकावीत. यशाचे मार्ग मोकळे होतील. माणसाचा मोठेपणा हा त्याच्या कपड्यावर नाही, तर त्याच्यामध्ये असलेल्या क्षमतेवर ठरवला जाते.
जगाच्या बाजारात आपला पाल्य सिद्ध व यशस्वी व्हावा, हीच आई वडिलांची मोठा इच्छा असते. पराक्रम करायचा वयामध्ये ज्यांना आवडी, निवडी संभाळता येत नाहीत, त्यांच्या समोर नेहमी अंधारच असतो. पालकांनी नव्या पिढीला नवी आव्हाने पेलता यावी यासाठी पाल्यांच्या क्षमतेचा विचार करावा व करीयरच्या वाटा निवडाव्यात.
डॉ. देशमुख म्हणाले, थोर स्वातंत्र्य सेनानी कै. आनंदराव नाईक यांची प्रेरना घेऊन शेतक-यांच्या व शिराळासारख्या डोंगरी भागातील मुलांना चांगल्या शिक्षणाची संधी मिळावी हा दृष्टकोन माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी ठेवला आहे. विश्वास उद्योग समूहाच्या माध्यमातून गुणवत्ता प्राप्त विद्यालये व विद्यार्थी यांना पुरस्काराने सन्मानित करण्याचा उपक्रम आदर्शवत असून या उपक्रमामधून निश्चितच युवा पिढीला प्रेरणा मिळेल.
माजी आमदार नाईक म्हणाले, केवळ विश्वास उद्योग समूह मशनरीत न गुंतता नवनवीन उपक्रम राबविण्यात यशस्वी झाला आहे. सर्वच घटकांचा कसा फायदा होईल या दुष्टीने वाटचाल सुरू आहे. शिराळ्यासारख्या डोगंरी व मागसलेल्या भागातील शेतक-यांचे रहाणीमान उचांवले पाहिजे व तो समृद्ध झाला पाहिजे. त्यांची मुले शिक्षणापासून वंचीत न रहाता ती उच्च शिक्षीत कशी होतील यासाठी शेती व शिक्षणाच्या दृष्टाकोणातून तालुक्याला वेगळी दिशा देण्याचे महत्वपूर्ण काम फत्तेसिंगराव नाईक इंडोमेंट ट्रस्टमार्फत गेली अनेक वर्षापासून सुरू आहे. विद्यार्थांना आत्मविश्वासाने पुढे जाता यावे व त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी गेली १९ वर्षे हा उपक्रम चालू केला आहे. चालू वर्षापासून स्पर्धा परिक्षेच्या तयारीसाठी मार्गदर्शन केंद्राचीही स्थापना करण्यात आली आहे. याचा लाभ विध्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन त्यांनी या वेळी केले.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले. स्वागत प्रा. डॉ. एस. आर. पाटील यांनी केले. पाहुण्यांचा परिचय ग्रामीण कथाकार बाबासाहेब परीट यांनी दिला. विश्वास उद्योग, शिक्षण समुह, आनंदराव नाईक पतसंस्था यांचे मार्फत गुणवत्ता प्राप्त विद्यालये, विद्यार्थी व केंद्रीय, राज्य लोकसेवा आयोग व इतर स्पर्ध परिक्षेतील गुणवंताना पुरस्काराचे वितरण झाले. फत्तेसिंगराव नाईक इंडोमेंट ट्रस्टमार्फत नव्याने सुरू करण्यात आलेल्या बारावी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना जे.ई.ई., नीट, सि.ई.टी. परीक्षा तयारी मार्गदर्शन केंद्याचे उद्घाटन डॉ. देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. विश्वास शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अमरसिंह नाईक, तालुक्याच्या सभापती मायावती कांबळे, सौ. सुनीतदेवी नाईक, सौ. मानिषदेवी नाईक, माजी सभापती भगतसिंग नाईक, सरपंच राजेंद्रसिंग नाईक, सर्जेरावदादा नाईक बँकेचे अध्यक्ष संजय नाईक, युवा नेते विराज नाईक, संचालक सर्वश्री. दिनकरराव पाटील, विजयराव नलवडे, यशवंत दळवी, शामराव माहिते, भीमराव गायकवाड, सुरेश पाटील, संभाजी पाटील, बाबुराव नांगरे, बाळासाहेब पाटील, विश्वास पाटील, विश्वास कदम, शिवाजी पाटील, माजी जिल्हा परिषद सद्कामगार संचालक दत्तात्रय पाटील, माजी संचालक पांडुरंग शिंदे, सूतगिरणीचे अध्यक्ष सुरेश चव्हाण, दूध संघाचे उपाध्यक्ष प्रकाश धस, कार्यकारी संचालक राम पाटील, अनिल पाटील, आनंदराव नाईक पतसंस्थेचे उपाध्यक्ष गजानन सोनटक्के, संचालक सुनील तांदळे आदी मान्यवर उपस्थित होते. आभार संचालक विजयराव नलवडे यांनी केले.
0 Comments