BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६ --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

बाजार समितीच्या सभापती सुरेश पाटील व उपसभापती सुभाष पाटील यांचा राजीनामा.

बाजार समितीच्या सभापती सुरेश पाटील व उपसभापती सुभाष पाटील यांचा राजीनामा.
शिराळा,ता.२४: कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती सुरेश पाटील व उपसभापती सुभाष पाटील यांनी तीन वर्षाचा कार्यकाल संपल्याने राजीनामा दिला असल्याने नवीन सभापती ,उपसभापती कोण याची उत्सुकता तालुक्यातील लोकांना लागली आहे.
या बाजार समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार मानसिंगराव नाईक व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सत्यजित देशमुख यांची सत्ता आहे.दोन भाऊंनी आघाडी करून सत्ता मिळवली होती.गत निवडणुकीत कॉंग्रेसच्या हिंदुराव बसरे यांना सभापती व राष्ट्रवादीच्या मंगल पाटील यांना उपसभापतीची संधी देण्यात आली होती. यावेळी प्रथम राष्ट्रवादीला सभापती पद देण्यात आले असल्याने सुरेश पाटील यांची सभापतीपदी तर कॉंग्रेसच्या सुभाष पाटील यांची उपसभापती पदी निवड करण्यात आली होती.तीन वर्षा नंतर काँग्रेसला सभापती व राष्ट्रवादीला उपसभापती पद देण्याचा निर्णय झाला होता.त्यानुसार सभापती व उपसभापती यांनी राजीनामे दिले आहेत. आत्ता आपल्या विभागात सभापती व उपसभापती पद मिळावे यासाठी दोन्ही काँग्रेस कार्यकर्त्यांची धडपड सुरु झाली असली तर अंतिम निर्णय हा मानसिंगराव नाईक व सत्यजित देशमुख या दोन भाऊंचा असणार आहे. त्यामुळे काँग्रेसचा सभापती व राष्ट्रवादीचा उपसभापती कोण याकडे तालुक्याच्या नजरा लागून राहिल्या आहेत.

Post a Comment

1 Comments