BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

स्वप्नपूर्तीसाठी अविरत ध्यासाची गरज : प्रा. के .एस. मोरे

शिराळा- रेड -शिराळा  येथील  श्री.  शिवाजीराव  देशमुख  शिक्षण  संकुलात  स्वागत  समारंभात  बोलताना  प्रा. के. एस. मोरे 
शिराळा:  स्वप्नपूर्तीसाठी   अविरतपणे  ध्यास  घेऊन  काम  केल्यास यश निश्चीत  मिळेल असे  प्रतिपादन  श्री. शिवाजीराव  देशमुख   जूनियर  कॉलेजचे  समन्वयक प्रा. के .एस. मोरे यांनी  केले.
     रेड -शिराळा  येथील  श्री. शिवाजीराव  देशमुख  शिक्षण  संकुलात  जूनियर  विभागाच्या  विद्यार्थ्यांच्या स्वागत  समारंभ प्रसंगी  बोलत  होते.
  यावेळी  मोरे  म्हणाले, "विध्यार्थीच्या  आवडी नुसार शिक्षण घेतल्यास  त्या   क्षेत्रामधे  तो  निश्चीत पणे यश  मिळवू  शकतो.  ग्रामीण  भागतील  विद्यार्थ्यांनी ग्रामीण  व  शहरी  ही  मानसिकता  न ठेवता संघर्षाची  भूमिका  ठेऊन  स्वःताला  सिद्ध करावे."
 यावेळी   प्रा. डॉ. एम. ए.  पाटील,  प्रा. समई ,  प्रा.  आर.आर. पोचे,  प्रा .पी  पा  यांनी  मनोगत  व्यक्त  केली .
 यावेळी  स्नेहा खोत  विध्यार्थीनी  मनोगत  व्यक्त  केले.   यावेळी प्रा डॉ. एम.  ए. पाटील,  प्रा  ऐश्वर्या पाटील, प्रा  सुप्रिया  पाटील , विनायक  नायकवडी  विशाल मदने  निलेश पाटील, सूर्यकांत जाधव ,शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी  उपस्थित  होते.

Post a Comment

0 Comments