BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

चांदोली धरणातून विसर्ग कमी; आरळा - शितुर व चरण- सोंडोली पुलावरून वाहतूक सुरु

                पाण्याखाली गेलेली वारणा काठची पिके
चांदोली धरणातून विसर्ग कमी; आरळा - शितुर व  चरण- सोंडोली पुलावरून वाहतूक सुरु
शिराळा,ता.२०:चांदोली धरणातुन वारणा नदीत पाणी सोडल्याने नदीकाठची पिके चार दिवसापासून पाण्याखाली गेली असून उस व भात पिके कुजू लागली आहेत.
       चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. आज सोमवारी  धरणात ३३.८० टी.एम.सी  पाणीसाठा असून गेल्या २४ तासात  २५ मिलीमीटर पावसासह एकूण  २५०५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणाच्या सांडव्यातून  ८५१० व विजनिर्मितीतुन  १२५५ क्युसेक असा एकूण ९७६५ क्युसेक विर्सग वारणा नदीत सुरू आहे.
चांदोलीचा विसर्ग कमी केल्याने  आरळा - शितुर पुलावरील पाणी पातळी कमी झाल्याने लोकांची  ये - जा सुरू झाली आहे. चरण- सोंडोली पुल वहातुकीसाठी खुला झाला आहे.

Post a Comment

0 Comments