BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

केरळ येथील अपद्ग्रस्तांना मदत करा ;प्रांताधिकारी नागेश पाटील

शिराळा: केरळ येथील आपद्ग्रस्तांना मदत देणेकामी बोलवलेल्या बैठकीत उपस्थितांशी चर्चा करताना आमदार शिवाजीराव नाईक, प्रांताधिकारी नागेश पाटील
केरळ येथील अपद्ग्रस्तांना मदत करा ;प्रांताधिकारी नागेश पाटील 
शिराळा,ता.२३:केरळ येथील अपद्ग्रस्तांना शिराळा तालुक्यातून वस्तू, खाद्य पदार्थ, आर्थिक स्वरूपात मदत करा असे अवाहन प्रांताधिकारी नागेश पाटील यांनी केले.
येथील तहसिल कार्यालयात आयोजित, राजकीय व सामाजिक प्रतिनिधी व शासकीय कर्मचाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते.अध्यक्षस्थानी आमदार शिवाजीराव नाईक होते.
यावेळी  पाटील म्हणाले, तालुक्यातील प्रत्येक गावाने केरळ बांधवांना मदत करा. मदत स्वीकारण्यासाठी तहसील व पंचायत समिती कार्यालय मध्ये मदत केंद्र सुरु करत आहोत. ज्यांना धान्य किंवा वस्तू स्वरुपात मदत करावयाची आहे त्यांनी रविवारी २६ तारखे पर्यंत आणून द्यावी. आर्थिक स्वरूपात मदत  ३० ऑगस्ट पर्यंत करावी.
 आमदार शिवाजीराव नाईक म्हणाले, केरळ बांधवांना मदत करणे हे आपले सामजिक कर्तव्य आहे. यातूनच तालुक्यातील प्रत्येक गावातील प्रमुख मंडळी, युवक कार्यकर्ते यांनी पक्ष, गट-तट न पाहता आपल्या गावात फिरून जास्तीत जास्त मदत गोळा करावी. कोणावरही सक्ती करू नये.
 मदत संकलित करण्याच्या कामात तलाठी, ग्रामसेवक, मुख्याध्यापक यांनी गावकऱ्यांना सहकार्य करावे. गावातील विविध सहकारी संस्था, व्यापारी, नोकरदार यांनी सढळ हाताने मदत करावी.  गावागावात जमा झालेली मदतीची रक्कम जिल्हा बँकेच्या नजीकच्या शाखेत भरून त्याचा डी.डी. तहसील कार्यालय किंवा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांचेकडे सुपूर्द करावेत. 
कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस के. डी. पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष सुखदेव पाटील, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष रघुनाथ पाटील, प्रकाश पाटील, कोकरूड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नीरज उबाळे यांनी मनोगत व्यक्त केले.
या बैठकीस प्रभारी तहसिलदार के. जी. नाईक, गटविकास अधिकारी अनिल बागल, सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील घोंगडे, विश्वास साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक राम पाटील, रणजितसिंह नाईक, उत्तम पाटील, आनंदा पाटील उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments