शिव भवानी नाग कॅम्पने मिरवणुकीसाठी आणलेला घोड्यांचा रथ मिरवणुकीचे आकर्षण ठरला.
शिराळा/शिवाजीराव चौगुले
अनेक वर्षे जिवंत नाग पूजेची परंपरा जोपासणाऱ्या शिराळकरांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत सलग पाचव्या वर्षी आपल्या उत्साही मनाला मुरुड घालत जिवंत नागा ऐवजी नागप्रतिमेची पूजा केली.
जिवंत नाग पूजा करणारे शिराळकर कशी पूजा करणार याची उत्सुकता सकाळ पासून बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना व प्रशासकीय यंत्रणेला होती.परंतु युवावर्गाने अत्यंत संयमाने आणि उत्साहात दिवसभर अंगावर पावसाच्या सरी झेलत हजारो भाविकांच्या उपस्थितीत नागपंचमी उत्साहात साजरी केली.
सकाळी सहा वाजले पासून नागमंडळे प्रतिकात्मक नाग घेऊन अंबामाता मंदिरात पूजेसाठी जात होते. त्या नंतर मिरवणुकीला सुरवात झाली.महिलांनी ही अंबामातेच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. वन विभागाच्यावतीने साप: अंधश्रद्धा व गैरसमज या विषयीव भित्ती पत्रकाच्या माध्यमातून ठीक ठिकाणी प्रबोधन केले.
नागपंचमी उत्साहात साजरी करण्यासाठी नागमंडळांनी मिरवणुकीसाठी पारंपरिक वाद्यांवर भर दिला होता.
दुपारी महाजनांच्या घरी नागप्रतिमेची पूजा करून पालखी अंबामाता मंदिराकडे नेण्यात आली. या पालखीचा मान भोई समाजाकडे आहे.शिराळा आगाराच्या वतीने ज्यादा गाड्या सोडण्यात आल्या होत्या.
कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी ५०० पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. १ उपविभागीय पोलीस अधिकारी , १४ पोलीस निरीक्षक,३३ सहायक पोलीस निरीक्षक, फौजदार ३६५ पोलीस कर्मचारी,५९ महिला पोलीस,५०वाहतूक पोलीस, ११ डॉल्बी विरोधी पथके,मिरवणूकीवर २० कॅमेऱ्याच्या माध्यमातून लक्ष ठेवले होते. मिरवणूक मार्गावर सी.सी.टीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते.
वनविभागाने १६५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती. त्यात १ उपवनसंरक्षक, २ विभागीय वनाधिकारी,४ सहायक वनसंरक्षक,१० वनक्षेत्रपाल,२३ वनपाल,४५ वनरक्षक,८० वनमजूर यांचा समावेश होता.
आरोग्य विभागाच्या वतीने पाडळी रोड तळीचा कोपरा,कोकरुड रोड एसटी स्टँड,शिराळा बसस्थानक,यादव हार्डवेअर,नगर पंचायत,व्यापारी असोसिएशन हॉल,मांगले रोड या सात ठिकाणी आरोग्य पथके नेमली होती. विद्युत पुरवठा खंडित होऊ नये यासाठी विद्युत वितरणने पथके नेमली होती.
1 Comments
मस्त
ReplyDelete