शिराळा: येथे प्रभारी तहसीलदार के.जी.नाईक यांना निवेदन देताना महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटी सरचिटणीस ॲड. मनिषा रोटे |
शिराळा: शिराळा येथील अनेक भक्तांचे श्रध्दास्थान असलेल्या गोरक्षनाथ मंदिर परिसराची तातडीने स्वच्छता नगरपंचातीने करावी. यासाठी तहसीलदार यांनी नगरपंचायतीस सुचना करून मंदिर परिसर स्वच्छ करावा यासाठी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस ॲड. मनिषा रोटे यांच्यावतीने प्रभारी तहसीलदार के. जे. नाईक यांना निवेदन देण्यात आले.
ॲड. मनिषा रोटे यांनी निवेदनात म्हटले आहे की, गोरक्षनाथ मंदिर परिसर स्वच्छतेबाबत अनेकदा मागणी करूनही ठोस उपाययोजना केली जात नाही.
या मागणीबाबत योग्य ती खबरदारी घेऊन मंदिर परिसराची आठ दिवसाच्या आत स्वच्छता करावी. अन्यथा संबधितावरती दप्तर दिरंगाई कायद्या अंतर्गत कारवाई करणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस ॲड. मनिषा रोटे यांनी दिला आहे.
यावेळी कल्पना कांबळे, माधुरी डोईफोडे, शुभांगी बेलवणकर, निलोफर इत्यादी उपस्थित होत्या.
1 Comments
छान
ReplyDelete