पन्हाळा - पावनखिंड पदभ्रमंती:
इतिहासाचे साक्षीदार होण्याचे भाग्य लाभले.
सभोवतालच्या डोंगरावर ढग पाय उतार झाले होते ,आजूबाजूला धुकं ,पावसाची रिपरिप सुरूच होती.आता शासनातर्फे तेथे सुंदर स्मारक ,पायऱ्या केल्या आहेत .जवळच्या एका मंदिरात जेवणाची सोय केली होती . ओल्या कपड्यनिशी परत एकदा शिरा, भात, आमटी, पुरी ई. वर ताव मारला आणि आमच्या गाडीतून शिराळा येथे संध्याकाळी ६. ३०वा परतलो . कडक पाण्याने अंघोळ करून जे झोपलो ते रात्री ११. ३० वाजताच जागे झालो. सर्व अंग जोरात ठणकत होते कसे बसे चार घास खाऊन झोपलो ते सकाळी ८ वाजताच डॉ प्रदीप यांच्या फोननेच उठवले. सकाळी १०. ३०वा दवाखाना, पेशंट असं रुटीन सुरु झाले.मनात मात्र दोन दिवसात झालेला प्रवास, अडचणी, निसर्ग चिखल ,पाणी, पाऊस, डोंगर रुंजी घालत होते .
आपण हि पद भ्रमंती एव्हड्या वर्षात केली नाही याचे शल्य बोचत होते ,पण आता येथून पुढे सर्व कुटुंब, मित्र परिवार ,पै पाहुणे ,यांच्या सह जमेल तितकी वर्षे करण्याचा द्दृढ -निश्चय केला
या ट्रेक मुळे एका जाज्वल्य इतिहासाचे साक्षीदार होण्याचे भाग्य लाभले. जीवनात येणाऱ्या अनेक कटू - गोड प्रसंगांना सामोरे जाण्याची उर्मी मिळाली .नवी मित्र मंडळी माणसे भेटली ,समाजात मिसळता आले याचे खूप समाधान वाटले
छ . शिवाजी महाराज ,बाजी प्रभू ,शिवा काशीद ,त्यांचे मावळे यांच्या बद्दलचे प्रेम ,आदर, अभिमान वृद्धिंगत झाला ,आणि स्वतःची मानसिक शारीरिक क्षमता सिद्ध करण्याची संधी मिळाली ,जीवन जगण्याची नवी उमेद , ऊर्जा मिळाली .
शिवरायांचे आठवावे रूप !
शिवरायांचा आठवावा प्रताप !
शिवरायांचा आठवावा साक्षेप !भूमंडळी !!१!!
आयोजक पं डितराव पोवार (अण्णा ), तसेच डॉ किरण भिंगार्डे ,डॉ प्रदीप पाटील यांचे मनःपूर्वक आभार, धन्यवाद
डॉ नितीन बा. जाधव
समाप्त
0 Comments