शिराळा (प्रतिनिधी)
चिखली (ता.शिराळा)येथील विश्वास विद्यानिकेतन येथे ७२वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
विश्वास शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अमरसिंह नाईक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी सचिव श्री.बाबासाहेब पाटील, सौ.मनिषादेवी नाईक,प्राचार्य, डॉ.एस.आर.पाटील, मुख्याध्यापक एस.बी.देसाई, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी आदी उपस्थित होते.
अमरसिंह नाईक (पापा) यांच्या हस्ते विविध स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. स्वागत व प्रास्ताविक सौ.व्ही.एम.जगताप यांनी केले तर एम.पाटील यांनी आभार मानले.
0 Comments