मांगले:येथे कुस्ती स्पर्धेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यां समवेत क्रीडा शिक्षक पी.एस.पाटील,अमर पाटील
........................................................................
ते म्हणाले, कारखान्याची ४८ वी वार्षीक सभा गुरूवारी दुपारी १ वाजता फत्तेसिंगराव नाईक लायन्स सेवा केंद्र भाटशिरगाव येथे होणार आहे. कारखान्याचे अध्यक्ष, माजी आमदार मानसिंगराव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. मागील सभेचा वृत्तांत वाचून कायम करणे. संस्थेच्या कार्याचा सन २०१७-१८या आर्थीक वर्षाचा संचालक मंडळाने सादर केलेला अहवाल स्विकारणे. संस्थेची १/४/२०१७ते ३१/३/२०१८ अखेरची जमाखर्च पत्रके (ताळेबंद व नफा-तोटा पत्रके) दाखल करून घेणे व स्विकारणे. सन २०१७-१८ या आर्थिक वर्षामध्ये अदाजपत्रकापेक्षा कमी, जास्त झालेल्या खर्चाची व सन २०१९-२०२० सालाकरिता मा. संचालक मंडळाने तयार केलेल्या अंदाजपत्रकाची नोंद घेणे. तसेच सन २०१९-२०२० सालाकरितां भांडवल उभारणेस मा. संचालक मंडळास अधिकार देणे. कारखाना व्यवस्थापनाखाली कार्यरत असणार्या फत्तेसिंगराव नाईक इंडोमेंट ट्रस्टच्या सन २०१८-१८ या आर्थिक वर्षाच्या हिशोब पत्रकास मंजूरी देणे. मे ए. डी. शिंदे आणि कंपनी, सांगली / कोल्हापूर सनदी लेखापाल यांचा सन २०१७-१८ चा लेखापरीक्षण अहवाल व त्यावरील मा. संचालक मंडळाने केलेला दोष दुरूस्ती अहवाल स्विकारणे. गळीत हंगाम २०१७-१८ मध्ये गळीत झालेल्या ऊसास देण्यात आलेल्या अंतिम ऊस दरास मान्यता देणे. सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाचे लेखापरिक्षण करणेकरितां लेखापरिक्षकाची नियुक्ती करणे. मा. अध्यक्षांच्या परवानगीने ऐनवेळी येणार्या विषयावर विचारविनिमय करणे, असे विषय सभेपुढे आहेत. तरी या सभेस सभासदांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.
............................................
तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत आश्रमशाळेचे यश
मांगले (ता.शिराळा) येथे आयोजित केलेल्या तालुकास्तरीय कुस्तीस्पर्धेत सद्गुरु आश्रम शाळेच्या कु.संजना माणिक कदम हीने ३८ किलो वजनी गटात दुसरा तर मंगल लोबू राठोड हीने ५६किलो वजनी गटात प्रथम क्रमांक पटकावला. त्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.त्यांना मुख्याद्यापक बी.डी.पाटील,एस.बी.टकले,क्रीडा शिक्षक पी.एस.पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.........................................................................
गुरूवारी विश्वासची वार्षिक सभा:राम पाटील
शिराळा: विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सभा गुरूवार (ता.२३) ऑगस्टला होणार आहे, अशी माहिती कार्यकारी संचालक राम पाटील यांनी दिली.ते म्हणाले, कारखान्याची ४८ वी वार्षीक सभा गुरूवारी दुपारी १ वाजता फत्तेसिंगराव नाईक लायन्स सेवा केंद्र भाटशिरगाव येथे होणार आहे. कारखान्याचे अध्यक्ष, माजी आमदार मानसिंगराव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. मागील सभेचा वृत्तांत वाचून कायम करणे. संस्थेच्या कार्याचा सन २०१७-१८या आर्थीक वर्षाचा संचालक मंडळाने सादर केलेला अहवाल स्विकारणे. संस्थेची १/४/२०१७ते ३१/३/२०१८ अखेरची जमाखर्च पत्रके (ताळेबंद व नफा-तोटा पत्रके) दाखल करून घेणे व स्विकारणे. सन २०१७-१८ या आर्थिक वर्षामध्ये अदाजपत्रकापेक्षा कमी, जास्त झालेल्या खर्चाची व सन २०१९-२०२० सालाकरिता मा. संचालक मंडळाने तयार केलेल्या अंदाजपत्रकाची नोंद घेणे. तसेच सन २०१९-२०२० सालाकरितां भांडवल उभारणेस मा. संचालक मंडळास अधिकार देणे. कारखाना व्यवस्थापनाखाली कार्यरत असणार्या फत्तेसिंगराव नाईक इंडोमेंट ट्रस्टच्या सन २०१८-१८ या आर्थिक वर्षाच्या हिशोब पत्रकास मंजूरी देणे. मे ए. डी. शिंदे आणि कंपनी, सांगली / कोल्हापूर सनदी लेखापाल यांचा सन २०१७-१८ चा लेखापरीक्षण अहवाल व त्यावरील मा. संचालक मंडळाने केलेला दोष दुरूस्ती अहवाल स्विकारणे. गळीत हंगाम २०१७-१८ मध्ये गळीत झालेल्या ऊसास देण्यात आलेल्या अंतिम ऊस दरास मान्यता देणे. सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाचे लेखापरिक्षण करणेकरितां लेखापरिक्षकाची नियुक्ती करणे. मा. अध्यक्षांच्या परवानगीने ऐनवेळी येणार्या विषयावर विचारविनिमय करणे, असे विषय सभेपुढे आहेत. तरी या सभेस सभासदांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.
............................................
1 Comments
आपण सामाजिक आणि शैक्षणिक बातम्या प्रसारित करुन समाजप्रबोधन करत आहात आपल्या या शिवरत्न प्रभोधनास हार्दिक शुभेच्छा.
ReplyDeleteप्रतापराव गायकवाड
NANA
अध्यक्ष शिक्षक संघ शिराळा