जि. प.शाळेतील मुलांना स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने योग किटचे वाटप करताना सरपंच शांताराम जाधव,डॉ.राजाराम पाटील,सुखदेव गुरव,उपसरपंच हणमंत पाटील,रणजित कांबळे,विजय जाधव,बाजीराव पाटील
-///---–--------------–-----------------///
शिराळा (प्रतिनिधी): शिराळा तालुक्यात शासकीय,निमशासकीय कार्यालये, शाळा महाविद्यालयात व विविध संस्थांमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
तहसील कार्यालयात प्रभारी तहसीलदार के.जी.नाईक यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.
पंचायत समिती येथे सभापती मायावती कांबळे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. कृषी उत्पन्न बाजार समिती येथे सभापती सुरेश पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. नगरपंचायत येथे नगराध्यक्षा सुनंदा सोनटक्के यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.
जि. प.शाळा ढाणकेवाडी येथे शंकर बिबेकर व उत्तम पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. जि. प.शाळा वाकुर्डे खुर्द येथे सैनिक आनंदा पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. मुलांनी त्यांना राखी बांधून सीमेवरील जवानांना राख्या पाठवल्या.
ग्रामपंचायत वाकुर्डे खुर्द येथे सरपंच शांताराम जाधव यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. शाळेतील मुलांना योगा किटचे वाटप करण्यात आले. सद्गुरु आश्रम शाळा येथे मुख्याध्यापक सर्जेराव टाकले यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. ग्रामपंचायत शिराळा खुर्द येथे सरपंच किरण पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. ग्रामपंचायत काळुंद्रे येथे सरपंच विजय पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. ग्रामपंचायत गवळेवाडी येथे सरपंच बाबासो गोळे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. ग्रामपंचायत भटवाडी येथे सरपंच विजय महाडीक यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.
जि. प.शाळा आरळा फ्री येथे ग्रामपंचायत सदस्या जयाबाई कांबळे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.
जि प शाळा वाडीभाग तडवळे येथे ग्रामपंचायत सदस्या सौ.सुरेखा पाटील यांचे हस्ते ध्वजवंदन झाले. कांदे ग्रामपंचायत येथे सरपंच सुवर्णा पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले.
निगडी ग्रामपंचायत येथे सरपंच सुवर्णताई भालेकर यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले.
|
0 Comments