BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

माजी सभापती रामचंद्र पाटील यांचे निधन

रामचंद्र गणपती पाटील (आप्पा) 
माजी सभापती रामचंद्र पाटील यांचे निधन
शिराळा,ता.३१: मणदूर (ता.शिराळा) येथील शिराळा पंचायत सामितीचे माजी सभापती व यशवंत  सहकारी ग्लुकोज कारखान्याचे माजी अध्यक्ष व आमदार शिवाजीराव नाईक यांचे राजकीय मार्गदर्शक रामचंद्र गणपती पाटील (आप्पा) (वय९३) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
गेले पन्नास वर्षाहुन अधिक काळ ते राजकारणात सक्रिय होते.सुरुवातीला पाच वर्षे उपसभापती तर नंतर सात वर्षे पंचायत समितीच्या सभापतीपदाची धुरा यांनी सांभाळली . पंधरा वर्षे ते जिल्हा परिषदेचे सदस्य होते. आठ वर्षे मणदूर  गावच्या सरपंच पदाचा कार्यकाळ त्यांनी सांभाळला. यशवंत ग्लुकोज कारखान्याचे पहिले चेअरमन म्हणून त्यांनी काम केले. सुरवातीला विधान परिषदेचे माजी सभापती  शिवाजीराव देशमुख साहेब तर १९९५ पासून आमदार शिवाजीराव नाईक याचे आज अखेर पर्यत खादे सर्मथक व बरोबरीने चालणारे नेते होते .चांदोली परिसरासह तालुक्यातील वाड्या वस्त्यांवर त्यांचा मोठा जनसंपर्क होता .सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक पुनर्वसित लोकांसाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले होते .त्यांच्या निधनामुळे मणदूर गावातील सर्व व्यवहार आज बंद ठेवण्यात आले . त्यांच्या पश्चात दोन मुले  सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे.
रक्षा विर्सजन रविवार दि .सप्टेंबर रोजी मणदूर येथे आहे.

Post a Comment

0 Comments