पन्हाळगड ते विशाळगड एक थरार
३५० वर्षांपूर्वी याच वाटेवरून महाराज पन्ह्याळगडावरून विशाळगडला रात्रभर प्रवास करून दुसऱ्या दिवशी सुखरुप पोहोचले;पण हि वाट किती अवघड ,खडतर होती याची जाणीव आम्हाला भर दिवसा ,क्षणाक्षणाला पावलोपावली होत होती. त्यावेळी उर अभिमानाने भरून येत होता. अंगावर शहारे येत होते . स्वतः च्या प्राणाची आहुती देणारे शिवा काशीद ,घोडखिंड जीवात जीव असे पर्यंत लढवणारे बाजी प्रभू,त्यांना साथ देणारे ३०० ते ३५० बांदल आणि इतर मावळे यांचा पराक्रम ऐकून, वाचून होतो. त्याची प्रचिती याची देही याची डोळा अनुभवून कृतार्थ झालो.पन्हाळगडावर बाजीप्रभूंच्या पुतळ्यासमोर सकाळी ८ वा . जमलेले ४०० ते ४५० लोक अगदी ६ वर्षाच्या मुलापासून ते ७० वयाच्या तरुण आजोबांपर्यंत चा सर्व निसर्गप्रेमी ,शिवप्रेमींचा समुदाय आसमंतात असलेले धुके, अधून मधून बरसणारा पाऊस ,जय शिवाजी जय भवानी च्या गर्जना, वातावरण एकदम भरून टाकणारे . आयोजकांनी पन्हाळगड पावनखिंडीचा इतिहास, पदभ्रमंतीचा मार्ग, घ्यावयाची काळजी,सूचना ई गोष्टी सांगितल्यानंतर पोहे व चहा घेऊन सर्व लोकांनी आपापली शिदोरी (२ चप्पात्या मटकीची भाजी )ताब्यात घेतली व पुन्हा एकदा जय शिवाजी जय भवानी चा घोष करून आमची मोहीम सुरु झाली रेनकोट ,पाठीवर सॅक ,पायातील बूट, हातात काठी सावरत दिंडी दरवाजाने पायउतार होऊन मसाई पठार गाठत असताना हा ट्रेक किती खडतर असणार याची जाणीव झाली
.पठारावर चालत असताना वाऱ्याच्या झोताबरोबर दरीतून वर वर उडणारे पाण्याचे तुषार बघून नेत्र तृप्त झाले. मसाई पठारावरून डोंगर उतरून कुंभारवाडा गावा पर्यंत चे ५.५ ते ६ किमी अंतर यायला २.५ तास लागले. पुढे खोतवाडी पर्यंत पोहोचायला १ तास गेला साधारणतः २ वा खोतवाडीत आल्यावर एका जि. प. शाळेच्या आवारात बसून सर्वांनी दिलेली शिदोरी फस्त केली . २०/२५ मी. ची छोटी विश्रांती घेऊन पुढील वाटचाल सुरु झाली .
0 Comments