BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493


मुख्यमंत्री सहाय्यता निधीस पाच लाखाचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे सुपूर्द करताना विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील सोबत पालक मंत्री सुभाष देशमुख
 विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांच्याकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस पाच लाख
मुंबई, दि. २२ :  केरळमधील पूरग्रस्तांना महाराष्ट्र शासनाकडून विविध प्रकारच्या मदतीचा ओघ सुरू आहे. राज्यातील जनतेने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत द्यावी या मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील य़ांनी आज पाच लाख रूपयांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपुर्द केला. यावेळी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख उपस्थित होते.
केरळमध्ये गेल्या शंभर वर्षातील सर्वात मोठा महापूर आल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. तेथील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राज्य शासनाने विविध पातळ्यांवर मदतीचा ओघ सुरू ठेवला आहे. राज्यातील जनताही आपल्या परीने मदत करत असून राज्याच्या मदतीमध्ये सर्वांनी सहभाग नोंदवावा, यासाठी आवाहन करण्यात येत आहे. सांगलीचे खासदार संजयकाका पाटील आणि पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी केरळ पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत करण्याचे आवाहन केले होते. 

Post a Comment

0 Comments