BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

पांडूरंगच्या आत्महत्या प्रकरणी तिघांना अटक

पांडूरंगच्या आत्महत्या प्रकरणी तिघांना अटक
शिराळा,ता.२८:  भाडळे ता.शाहूवाडी, जि कोल्हापूर) येथील पांडुरंग रामचंद्र पाटील ( वय३४ ) यास आत्महत्येला प्रवृत्त केल्या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.
 कांदे ( ता.शिराळा ) येथे  पांडुरंग रामचंद्र पाटील  यांनी १९ ऑगस्टला बहिणीच्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती.  त्याच्या मृत्यूस कारणीभूत असल्या प्रकरणी सुनीता भगवान बाचनकर, भगवान गुंगा बाचनकर , रघुनाथ गुंगा बाचनकर अशी अटक करण्यात आली आहे.
  याबाबत माहिती अशी की , सुनीता हिने मयत पांडुरंग यास फोनकरून  घरी बोलावून घेतले असता घरामध्ये सुनीताचा नवरा भगवान व दीर रघुनाथ यांनी पांडुरंग यास तू सुनीता कडे वाईट नजरेने पाहतोस व सारखा घरी का येतोस अशी विचारणा केली.यावेळी मयत पांडुरंग यास सुनीता , भगवान, रघुनाथ या तिघांनी संगनमताने मारहाण केली तसेच जीवे मारण्याची धमकी देऊन  शाहूवाडी पोलीस ठाण्यात पांडुरंग विरुद्ध सुनीता हिने छेडछाड केल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पांडुरंग कांदे येथे बहिणीच्या घरी आला व त्याठिकाणी त्याने गळफास लावून आत्महत्या केली.याबाबत शिवाजीराव पाटील यांनी वर्दी दिली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण जाधव हे करीत आहे.

Post a Comment

0 Comments