BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

माजी आमदार मानसिंगराव नाईक यांच्या वाढदिवसा निमित्त सुलभदरात तालुक्यात ५९४५ औजारांचे वाटप: कार्यकारी संचालक राम पाटील

शिराळा येथे औजारे वाटप उपक्रमाचा शुभारंभ करताना अध्यक्ष, माजी आमदार मानसिंगराव नाईक व शेतकरी बंधू.
माजी आमदार मानसिंगराव नाईक यांच्या वाढदिवसा निमित्त सुलभदरात तालुक्यात ५९४५ औजारांचे वाटप: कार्यकारी संचालक राम पाटील
शिराळा,ता.३१: ‘विश्वास’ कारखान्याचे अध्यक्ष, माजी आमदार मानसिंगराव नाईक यांच्या वाढदिवसापासून सूरू करण्यात आलेल्या शेतकर्‍यांना सुलभ दरात शेती औजारे वाटप उपक्रमास मोठा प्रतिसाद मिळाला असून तालुक्यातील ५ हजार ९४५ शेतकर्‍यांनी औजारांची खरेदी करून उपक्रमास उदंड प्रतिसाद दिला आहे. ही माहिती कार्यकारी संचालक राम पाटील यांनी दिली.
पाटील म्हणाले नाईक यांचा वाढदिवसानिमित्त कारखाना कार्यक्षत्रातील शेतकर्‍यांना सुलभ दरात शेती औजारे वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला. या उपक्रमात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा सहभाग होता. तालुक्यातील गाववार नियोजन करून उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात आला. शेतकर्‍यांना बाजारभावा पेक्षा कमी किंमतीत साहित्या उपलब्ध झाल्याने यामध्ये मोठ्या संखेने खरेदी झाली. शेती विभागाचे मुख्या शेती अधिकारी विठ्ठल चव्हाण व त्यांच्या सहकार्र्‍यांनी विशेष परिश्रम घेतले. सागाव, मांगले, शिराळा, पाडळी, बिऊर व कोकरूड या गटातील शेतकर्‍यांनी उपक्रमास उदंड प्रतिसाद दिला. गावावर विक्री झालेले साहित्याची व संख्या अशी ः स्प्रे पंप ः ७७२ खोरे, पाटी व टिकाव ः १हजार ४३८, ताडपत्री ः ७३३  मॅट ः ६८ चारा कटींग विळती ः ३८० भात कापणी खुरपे ः ५४६ प्लॉस्टीक खोर ः ७०, साकल कोळपा ः १हजार १६८ विळा कोयता ः ७८४, नारळ सोलणी यंत्र ः ३६
................................


Post a Comment

0 Comments