BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

पन्हाळा - पावनखिंड पदभ्रमंती भाग ३: जीवनातील चढ उतार ,सुखः दुःखाचे प्रसंग एकमेकांना सांगत आमची भटकंती सुरु

पन्हाळा - पावनखिंड पदभ्रमंती भाग ३
जीवनातील चढ उतार ,सुखः दुःखाचे प्रसंग एकमेकांना सांगत आमची भटकंती सुरु
 रात्री ८. ३० वा संयोजकांकडून गरम गरम भात, मसूर आमटी चा बेत होता . दिवसभर चालून दमलो असल्याने जेवण इतकं रुचकर आणि पोटभर झाले कि पंचपक्वान्न फिके पडावे .परत तासभर गप्पा मारून चटईवरच ताणून दिली.  वाऱ्याचा        आवाज ,रात्रभर कोसळणारा पाऊस ,कौलातून अंगावर पडणारे तुषार ,ठणकणार अंग यामुळं अधे मध्ये जाग येत होती, एकमेकांना पाय लागत होते ,काहीजण  घोरत होते( त्यांनी मान्य नाही केले ते सोडा) ,सकाळी ६ ते ६. ३० पर्यंत सर्वजण उठलो .आवरून  बॅगा भरल्या, तेव्हड्यात चहा आला, क्रीम रोल बिस्किटे होतीच सोबतीला . कालच्याच ओल्या कपड्यांना पिळून अंगावर घातले व सर्वजण भिजलेले मोजे बूट घालून ८. ३० पर्यंत तयार झालो .परत जय शिवाजी जय भवानी चा गजर आणि नव्या उत्साहात दुसऱ्या दिवशीच्या उर्वरीत मोहिमेस सुरुवात.वाटेतच १ व २ नं आटोपले
आजचा प्रवास आंबेवाडी ते पावनखिंड जवळपास २३/२४ किमी चा आज  कालपेक्षा जास्त जोरात पाऊस, सोसाट्याचा वारा सोबतीला होता.वाट कालच्या  सारखीच दगड धोंड्यांची ,चिखलाची,खाचखळग्यांची ओढ्या नाल्यांची .
कालच्या दिवशी कुंभारवाडी गावात येई पर्यंत कृष्णाच्या डाव्या बुटाचा सोल निघाला ,रुमाल बांधला ,डॉ किरण यांनी छोट ऑपरेशन करून नायलॉन दोऱ्याने शिवून दिला पण आंबेवाडीत जाईपर्यंत कसाबसा तग धरला तोपर्यंत दुसऱ्या बुटाने आपला सोल सोडला .मग काय! पुढे वाटचाल कशी करायची हा यक्ष प्रश्न ,.डॉ किरण नि त्यांच्या भावाला फोन करून ५ किंवा ६ न. चा नवीन बूट आणायला सांगितला ,जो आम्हाला दुसऱ्या दिवशी २ तासांनी मिळाला, तो पर्यंत कृष्णा मोठ्या धैर्याने जुन्या सोल निघालेल्या बुटाने वाट तुडवीत होती असो .
 वाटेत एकमेकांना आधार देणं ,खाऊ खाणं ,नाल्यांचे झऱ्यांचे अति शुद्ध पाणी पिणं चालूच होत .एकमेकांना सांभाळत, गप्पा मारत ,पूर्वीचे अनुभव ऐकत ,ऐकवत, जीवनातील चढ उतार ,सुखः दुःखाचे प्रसंग एकमेकांना सांगत आमची भटकंती सुरु होती . निसर्गाची वेगवेगळी आल्हाददायक , सुंदर, धीरगंभीर ,रौद्र ,नयनरम्य ,लोभस रूपे पावला पावलावर आम्हाला जाणवत होती . वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज कानी पडत होते. अनेक रानफुले, वनस्पती, वेगवेगळी छोटी मोठी झाडे, विविधतेने नटलेले जंगल, वनराई डोळ्यांना सुखावत होती ,अधून मधून पाऊस बरसत, गर्जत ,कोसळत होता .निसर्गापुढे स्वतःतला गर्व, अभिमान ,सु:खदुःख थिटे पडत होती ,जगाचा विसर पडला होता .दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास आम्ही पावनखिंड,कासारी नदीचा  उगम असणाऱ्या  भागामध्ये पोहोचलो .

Post a Comment

0 Comments