शिराळा: न्यू इंग्लिश स्कूलचे शिक्षकेतर कर्मचारी रामचंद्र बापू कांबळे यांचा सेवा निवृत्ती निमित्त सपत्नीक सत्कार करताना संस्थेचे अध्यक्ष सुधाकर हसबनीस, सोबत डी.आर.महाजन
प्रामाणिकपणे केलेली सेवा आयुष्यात उपयोगी पडते: सुधाकर हसबनीस
रामचंद्र कांबळे यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार
शिराळा,ता.२६: प्रामाणिकपणे केलेली सेवा आयुष्यभर उपयोगी पडते असे प्रतिपादन हाय्यर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुधाकर हसबनीस यांनी केले.न्यू इंग्लिश स्कूल येथे शिक्षकेतर कर्मचारी रामचंद्र बापू कांबळे यांच्या सेवा निवृत्ती निमित्त आयोजित निरोप समारंभ कार्यक्रमात बोलत होते. झाले.
अंगराज माजगावकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. संजय सूक्ते,सुनील नांद्रे यांनी सूत्रसंचलन केले. यावेळी संस्थेचे व्हा.चेअरमन, डी.आर.महाजन, कार्यवाह ,बं.चिं.दिगवडेकर, संचालक बाबुराव पवार, सौ.विद्या हसबनीस, हणमंत जोशी, रघुनाथ बुकशेटे, प्रकाश नवंगुळ, रणजितसिंह नाईक, मुख्याध्यापक शिवाजी भोसले, उपस्थित होते.वसंत पाटील यांनी आभार मानले.
0 Comments