शिराळा:केरळ पुरग्रस्तांच्यासाठी चिखली येथील विश्वासराव नाईक कारखान्यामार्फत एक लाख रूपयाचा धनादेश प्रभारी तहसीलदार के. जी. नाईक यांचेकडे सुपूर्द करताना कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार मानसिंगराव नाईक सोबत नायब तहसीलदार आर. एस. सिद, कार्यकारी संचालक राम पाटील
केरळ पुरग्रस्तांच्यासाठी विश्वासराव नाईक कारखान्याकडून एक लाख
शिराळा तालुक्यातून मदतीचा ओघ सुरुशिराळा,ता.३१: केरळ पुरग्रस्तांच्यासाठी चिखली येथील विश्वासराव नाईक कारखान्यामार्फत कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी एक लाख रूपयाचा धनादेश प्रभारी तहसीलदार के. जी. नाईक यांचेकडे सुपूर्द केला. या वेळी नायब तहसीलदार आर. एस. सिद, कार्यकारी संचालक राम पाटील उपस्थित होते.
सह्याद्री खरेदी विक्री संघाच्यावतीने ५०००, सर्जेरावदादा नाईक शिराळा सहकारी बँक ५०००, सह्याद्री पब्लिक स्कुल १०,३०० चा धनादेश देण्यात आला आहे.
0 Comments