BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

सागाव मध्ये अखंड हरिनाम व वीणा पारायण सोहळ्यास प्रारंभ.


सागाव मध्ये अखंड हरिनाम व वीणा पारायण सोहळ्यास प्रारंभ.
शिराळा- २९: १०० वर्षाची परंपरा असणाऱ्या अखंड हरिनाम व वीणा पारायण सोहळ्यास सागांव ता.शिराळा येथील श्री.कृष्ण मंदिरात प्रारंभ झाला.
 श्री.काशिनाथ कांबळे (गुरुजी)यांचे हस्ते वीणापूजन,श्री.ईश्वरा सागांवकर याचे हस्ते ज्ञानेश्वरी पूजन तर श्री.गोरख तिके यांचे हस्ते कलश पूजन होऊन पारायणास सुरुवात झाली. यावेळी ह.भ.प.श्री.दत्तात्रय कुंभार महाराज,हभप श्री.हरिदास मोहिते महाराज,पेटीवादक प्रकाश तिके उपस्थित होते. येत्या सात दिवसात काकड आरती,हरिपाठ,भजन,कीर्तन असे धार्मिक कार्यक्रम होणार असून अष्टमी दिवशी श्रीकृष्ण जन्मोत्सव व गोपाळ काल्यादिवशी दहीहंडी फोडून पारायणाची सांगता होणार असल्याचे विश्वस्थ मंडळाकडून सांगण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे नियोजन श्री.तानाजी लोखंडे,प्रसाद सागांवकर,विठ्ठल लोखंडे,मंगेश तिके,हरीश करडे (सर),संतोष कांबळे,हरिदास कांबळे करत आहेत.

Post a Comment

1 Comments