BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

चिमुकल्यांच्या राखीने भारावले पोलीस भाऊ

शिराळा  पोलीस ठाण्यात  सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील घोंगडे यांना राखी   बांधताना  स्प्रिंगडेल  स्कूलच्या  विद्यार्थिनी
शिराळा  पोलीस ठाण्यात  राखी   बांधताना  स्प्रिंगडेल  स्कूल  च्या  विद्यार्थिनी. 
 चिमुकल्यांच्या राखीने भारावले पोलीस भाऊ
शिराळा पोलीस ठाण्यात रक्षाबंधन
शिराळा:  रेड - शिराळा  येथील  श्री. शिवाजीराव  देशमुख शिक्षण  समुहा मधील  स्प्रिंगडेल  स्कूलच्या  विद्यार्थिनीनी  शिराळा पोलिसांना  राखी  बंधून  रक्षाबंधन  सण  साजरा  केला.
  विद्यार्थिनीनी सहायक पोलीस  निरीक्षक  स्वप्ननील  घोंगडे, प्रवीण जाधव यांच्यासह इतर पोलीस बांधवाना राख्या बांधल्या
 यावेळी  पोलीस  निरीक्षक स्वप्ननील  घोंगडे,  म्हणाले कायम कामावर असल्याने आम्हाला  आमच्या  कुटुंबासोबत  सण  साजरा करता  येत  नाहीत.  स्प्रिंगडेल  स्कूलच्या लहान  भगिनीनी  आम्हाला  राखी  बांधून  आमच्या बहिणींची भासणारी उणीव  भरून  काढली.
 यावेळी  पोलीस  बांधवानी  या लहान  भगिनींना  खाऊ  वाटप केले. यावेळी  दीपाली  कदम , रुबिया  अत्तार, सूर्यकांत जाधव , शशीकांत यादव, विनोद  पाटील, शिक्षक, विद्यार्थिनी   व पोलीस  कर्मचारी  उपस्थित  होते.

Post a Comment

0 Comments