BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

प्रतिकुल परिस्थिती विरोधी संघर्ष करणारेच यशस्वी होतात - शिक्षणाधिकारी निशादेवी वाघमोडे

 खुंदलापूर (ता.शिराळा) येथे मुलांना साहित्य वाटप व सत्कार समारंभ प्रसंगी बोलताना शिक्षणाधिकारी निशादेवी वाघमोडे,सोबत प्रभारी गटशिक्षणाधिकारी बाजीराव देशमुख, मधुवंती धर्माधिकारी,सुधीर बंडगर
प्रतिकुल परिस्थिती विरोधी संघर्ष करणारेच यशस्वी होतात  - शिक्षणाधिकारी निशादेवी वाघमोडे
शिराळा,ता.२७:ग्रामिण भागातच खरी शारीरिक , मानसिक , बौद्धीक गुणवत्ता आहे. मात्र प्रतिकुल परिस्थिती व अडचणी असताना त्या विरोधात संघर्ष करणारेच विद्यार्थी यशस्वी होतात असे प्रतिपादन शिक्षणाधिकारी सौ. निशादेवी वाघमोडे यांनी केले.
खुंदलापुर ( धनगरवाडा ) , ता. शिराळा ,येथे आयोजित करण्यात आलेल्या गरजू, आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांना शालेय वस्तू वाटपव गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्यात बोलत होत्या.
यावेळी वाघमोडे म्हणाल्या,ग्रामिण भागातील मुलांनी प्रवाहाच्या विरोधात जाऊन यश मिळविणे गरजेचे आहे. रडत बसण्यापेक्षा लढणे महत्वाचे आहे. रानमाळावरच फुल कधीच कोलमडत नसते ते निसर्गाशी झुंज देत वादळात उभेच असते. या उलट अनुकूलते मध्ये फुललेला गुलाब लगेच कोमजत असतो.लाखो बेरोजगारा मध्ये आपल्यालाच नोकरी मिळाली असल्याने शिक्षकानी सुद्धा तळमळीने काम करून ग्रामिण भागातील गुणवत्तेला फुलवने गरजेचे आहे. सुधीर बंडगर हे या डोंगरी भागात शिक्षण व क्रीडा  प्रसाराचे महान कार्य करून राष्ट्रहित जोपासत आहेत त्यांचे काम आदर्शवत आहे. चाळीस वर्षापासुन दारूबंदी असणारे हे जंगलातील गाव राज्यास आदर्शवत आहे. गटशिक्षणाधिकारी बाजीराव देशमुख म्हणाले, देशाला खरा धोका हा परकीयापासून नसुन कामचुकार करणाऱ्या स्वकीय लोकांपासूनच आहे. प्रतिकुलतशी, निसर्गाशी झुंज देत रहाणारी ही डोंगरी भागातील शाळा शिक्षकानी आधिक वेळ देऊन राज्यात आदर्शवत बनवावी.  केंद्रप्रमुख मधुवंती धर्माधिकारी म्हणाल्या चांगल्या कामासाठी , विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी सदैव सहकार्य राहील.प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करून दहावी,बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी प्राथमिक शिक्षक गणेश झुंजारे यांनीही मनोगत व्यक्त केले. सुधीर बंडगर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले .
यावेळी सरपंच बाबुराव गावडे, उपसरपंच सिताराम गावडे,तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष तुकाराम गावडे, पोलिस पाटील धाकलू गावडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नामदेव गावडे,मणदूरचे केंद्रप्रमुख हरीभाऊ घोडे, सर्जेराव जाधव उपस्थित होते.मुख्याध्यापक धनाजी पवार यांनी आभार मानले. 

Post a Comment

0 Comments