धामवडेत दिवसा दीड लाखाच्या दागिन्यांची चोरी
शिराळा,ता.२५: धामवडे ( ता.शिराळा) येथे भरदिवसा राहत्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यानी एक लाख ५० हजार रुपयांचे सोने - चांदीचे दागिने चोरून नेले. ही घटना शुक्रवार दि .२४ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५:१५ च्या दरम्यान घडली.यामुळे परिसरात भीतीचे वातावरण तयार झाले आहे.
याबाबत शिराळा पोलिसांच्या कडून मिळालेली माहिती अशी की, नितीन बबन मादळे हे मुंबई मध्ये असतात तर घरातील इतर लोक शेतामध्ये गेले असता अज्ञात चोरट्यानी घराचे तसेच घरातील तिजोरीचे कुलूप तोडून २० ग्रामचा लक्ष्मी हार , २० ग्रामचे मंगळसूत्र , लहान मोठ्या ६ सोन्याच्या अंगठ्या तसेच चांदीचे पैंजण असा १ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. शेतातून घरी आल्यावर चोरीची घटना उघडकीस आली. याबाबत आज शिराळा पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक स्वप्नील घोंगडे हे करीत आहेत.
2 Comments
चोराला कस माहीत की एवढा माल घरी आहे आणि त्याच घरी दुसऱ्या कुठल्या नाही
ReplyDeleteNigraine teun keleli
DeleteChori