BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

विश्वास वार्षीक सभा


भाटशिरगाव( ता.शिराळा)येथे लोकनेते फतेसिंगराव नाईक लायन्स सभागृहात कारखान्याच्या ४८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेवेळी बोलताना अध्यक्ष माजी आमदार मानसिंगराव नाईक व सभासद

ऊस उत्पादक शेतकरी व कारखानदारांना अडचणीत आणण्याचे काम केंद्र व राज्य शासन करत आहे;.माजी आमदार मानसिंगराव नाईक . 

शिराळा ,ता.२३: ऊस उत्पादक शेतकरी व कारखानदारांना अडचणीत आणण्याचे काम केंद्र व राज्य शासन करत असल्याचे प्रतिपादन विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले .
भाटशिरगाव (ता.शिराळा)येथे लोकनेते फतेसिंगराव नाईक लायन्स सभागृहात कारखान्याच्या ४८व्या वार्षिक सर्वसाधारण सभेवेळी बोलत होते .यावेळी नाईक म्हणाले,केंद्रसरकार साखरचे चुकीचे धोरण राबवत असल्यामुळे शेतक-यांच्यासह कारखानदारांना ते मारक ठरत आहे.कारण साखरेला दर असताना निर्यातबंदी व दर
कमी झाल्यावर निर्यातीची सक्ती लादली.इतरा प्रमाणे संस्था मोडीत मोडीत काढण्याचे उद्योग विश्वास उद्योग समूह करत नाही.साखरेचे दर वाढले तर दिपावली पर्यंत १३०रुपये ऊस उत्पादकांना दिले जातील.विश्वास कारखाना चालवण्यासाठी फतेसिंगराव नाईक आप्पांनी अहोरात्र कष्ट केले.त्यामुळे त्यांचे कारखानाकार्यस्थळावर भव्य स्मारक उभे करण्यात येणार आहे.यावेळी रणजितसिंह नाईक, अण्णा गायकवाड, सम्राटसिंह शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले.सर्व विषय टाळ्यांच्या गजरात मंजूर करण्यात आले.
स्वागत प्रस्ताविक विजयराव नलवडे यांनी केले .कार्यकारी संचालक राम पाटील यांनी नोटीस वाचन केले. यावेळी  कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील, शिवाजीराव घोडे, अशोकराव पाटील, बाबासाहेब पवार, अमरसिंह नाईक,राजेंद्र नाईक, उपसभापती सम्राटसिंह नाईक, हंबीरराव नाईक, विराज नाईक, विवेक नाईक, संजय नाईक, उदयसिंगराव नाईक,अभिमन्यू निकम,राजेंद्र नाईक, भगतसिंग नाईक,विलासराव पाटील, दिनकर पाटील, युवराज गायकवाड, धनाजीराव घोरपडे, दिलीप पाटील, उपस्थित होते. संचालक हंबीरराव पाटील यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments