केरळमधील आपत्तीग्रस्तांसाठी मदत करा
: जिल्हाधिकारी वि. ना. काळम
सांगली, दि. २०, (जि. मा. का.) : केरळमधील पूरस्थिती गंभीर असून तेथील नागरिकांना तात्काळ मदतीची आवश्यकता आहे. त्यासाठी सांगली जिल्ह्यातील नागरिक, दानशूर व्यक्ती, व्यापारी यांनी आपत्तीग्रस्तांना सढळहस्ते मदत करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांनी केले आहे.
ही मदत पॅकिंग केलेले अन्नपदार्थ किंवा बिस्कीटस तसेच आर्थिक स्वरूपात जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे आज सायंकाळपासून स्वीकारण्यात येईल. मदत संकलनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात तळमजल्यावर कक्ष उघडण्यात आला आहे. त्याचप्रमाणे तालुकास्तरावरही तहसिल कार्यालयामध्ये मदत संकलीत करण्यात येईल.
दानशूर व्यक्तींनी मदतीच्या स्वरुपाबाबत माहिती द्यावी. तसेच आर्थिक स्वरुपात मदत करु इच्छिणाऱ्यांनी केरळ मुख्यमंत्री आपत्ती निवारण सहाय्यता केंद्र (सीएमडीआरएफ) खाते क्रमांक 67319948232, एसबीआय सिटी ब्रँच तिरुअनंतपुरम आयएफसी कोड - एसबीआयएन 0070028 या खात्यावर जमा करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांनी केले आहे.

0 Comments